ताहेरा फाउंडेशनचे कार्य अनुकरणीय —किशोरसिंह माने पाटील.

ताहेरा फाउंडेशनचे कार्य अनुकरणीय —किशोरसिंह माने पाटील.
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 08/10/2023 : ताहेरा फाउंडेशनचे कार्य अनुकरणीय आहे असे मत अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच किशोरसिंह मारुतराव माने पाटील यांनी व्यक्त केले. गरजवंतांना विमा आणि मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन ताहेरा फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पुरस्कारामुळे वाढलेल्या जबाबदारीतून आणखीन समाजासाठी योगदान देण्याचे आवाहन किशोरसिंह माने पाटील यांनी सत्कारमूर्तींना आपल्या भाषणातून केले. मोहम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्ताने समाजातील गरजवंतांचा भारतीय डाक विभागाची लाभदायी योजना विमा कवच देऊन 15 गरजवंतांना ताहेरा फाउंडेशनने सहकार्य केले. मुस्लिम समाजातील सामाजिक बांधिलकी जपणारे अकलूज मधील सरफराज शेख, भैय्या माढेकर, हमीदभाई मुलाणी तनवीर तांबोळी, असलम सय्यद, सलीम सय्यद, नाझीम खान, गौस बागवान, अजहर काझी,
शकूर तांबोळी, शौकत तांबोळी आणि एस एस काझी यांचा सन्मानचिन्ह देऊन किशोरसिंह माने पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सत्कार मुर्तीतून उत्तर देताना हमीद मुलांणी यांनी फाउंडेशनच्या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले, फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. भैय्या माडेकर यांनी आपल्या मनोगतामध्ये आपले सामाजिक अनुभव सांगताना ताहेरा फाउंडेशनचे संस्थापक हाजी अब्दुल कादर यांच्या सामाजिक कार्याच्या आठवणीला उजाळा दिला. ताहेरा फाउंडेशनच्या उपक्रमाचे अभिनंदन केले. सोलापूर जिल्हा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष मुक्तारभाई कोरबू यांनी आपल्या मनोगतातून गरजवंतांचा विमा उतरवण्याच्या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत नेहमी गरिबांच्या पाठीशी राहणाऱ्या ताहेरा फाउंडेशनचे तोंड भरून कौतुक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबुबकरभाई तांबोळी यांनी गत तीन वर्षात ताहेरा फाउंडेशनने राबवलेल्या विविध कार्याची ओळख उपस्थितांना करून दिली. समाजभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या चेहऱ्यावर आपल्या कामाची पोहचपावती झळकत होती. तर गरजवंतांना विमा उतरवल्याचे समाधान विमाधारकांच्या नजरेतून जाणवत होते. या विमा धारकांना मध्ये ताहेरा रफीक तांबोळी.सुनिता रमेश मदने.नसरीन अन्वर बागवान.परवीन मतीम बागवान.लक्ष्मी बाळू मटिंडा.हसिना असिफ तांबोळी.शरिफा आबिद तांबोळी.अनिसा तय्यब बागवान.शकिला मुनीर आतार.नाजनीन अल्ताफ बागवान.रेश्मा सलीम बागवान.रूक्साना नजिरमहंमद तांबोळी.शालन हरी चौगुले.यांना मिळाला.
अकलूज परिसरात वैविध्यपूर्ण उपक्रमा बद्दल ताहेरा फाउंडेशनचे कौतुक होत आहे. सदर कार्यक्रमाला खलील देशमुख सर, मौलाभाई मुलाणी सर, आरिफभाई पटेल, जमीर चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हाजी असलमभाई तांबोळी, मुसाभाई तांबोळी, मुन्नाभाई तांबोळी, जाकिर तांबोळी,शाहिद तांबोळी, शादाब तांबोळी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शकील मुलाणी व इलाही बागवान यांनी केले.