शिक्षण प्रसारक मंडळातील शिक्षकांचा गौरव

शिक्षण प्रसारक मंडळातील शिक्षकांचा गौरव
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 28 डिसेंबर 2024 : महाराष्ट्र शासनाने आदर्श शिक्षण संस्था म्हणून गौरवलेल्या
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज या संस्थेच्या विविध शाखेतील मुख्याध्यापक, शिक्षक व सेवक यांना महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने कृतिशील शाळा, शिक्षक व सेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुणे विभाग व शिक्षकांचे माजी आ. दत्तात्रय सावंत , सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी सौ.जगताप यांच्या हस्ते मोरजाई विद्यालय मोरोची व कृष्णानंद विद्यामंदिर पाटीलवस्ती या शाळेस कृतिशील शाळा पुरस्कार तसेच विजय उबाळे, व दिलीप शिर्के यांना कृतिशील मुख्याध्यापक म्हणून तर बिभीषण जाधव, हनुमंत देवकते, कलावती पालवे, धनंजय जाधव,उमेश भिंगे यांना कृतिशील शिक्षक,उमेश भिंगे यांना कृतीशिल क्रीडा शिक्षक, आणि सादिक झारेकरी यांना कृतिशील लिपिक पुरस्कार, ज्ञानेश्वर शेलार यांना कृतिशील कला शिक्षक, नारायण देवकाते यांना कृतिशील ग्रंथपाल, बाळासाहेब मुळीक यांना कृतिशील प्राध्यापक आणि रविराज नलवडे यांना कृतिशील कृषी प्राचार्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कारा बद्दल संस्थेचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील, सचिव अभिजित रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, सर्व संचालक, संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर, सेवक यांनी अभिनंदन केले.