“प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थ्यांना प्रगत बनवते” : आर .सी. फडे

“प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थ्यांना प्रगत बनवते” : आर .सी. फडे
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 26 डिसेंबर 2024 : “प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थ्यांना प्रगत बनवते.” बाजार दिवसाच्या माध्यमातून व्यवहार ज्ञान तर कळतेच पण विद्यार्थ्यांना कुटुंब कसे चालते याचे हे ज्ञान येते. असे मत सीए आर.सी. फडे यांनी व्यक्त केले. माळशिरस तालुक्यातून अनेक विद्यार्थी घडावेत यासाठी अकलूज सी. ए. असोसिएशन विद्यार्थ्यांना सी.ए. बनण्यासाठी मार्गदर्शन करेल असे ही आश्वासन त्यांनी दिले.
रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल, विद्यालय ज्यु. कॉलेज मांडवे बालचमूंचा आनंदी बाजार दिवस यामध्ये 199 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये विविध पालेभाज्या, फळभाज्या, खाद्यपदार्थ, जनरल स्टोअर्स, थंड पेय इत्यादी विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आलेले होते बाजारात जवळजवळ 2 लाखापर्यंतची उलाढाल झाली.बाजार दिवस साजरा करण्यासाठी प्रमुख पाहुणे आर. सी. फडे सी.ए. अकलूज, अनंतलाल दोशी संस्थापक अध्यक्ष रत्नत्रय परिवार, शशील गांधी सी.ए अकलूज, मा. नितीन कुदळे सी.ए. अकलूज, मा. अमित दोशी सीए माळशिरस, मा श्री मयूर फडे सी.ए. अकलूज, राहुल पिसे कर सल्लागार नातेपुते, अॅड मयूर शहा कर सल्लागार नातेपुते, अजितकुमार दोशी, सदाशिवनगरचे सरपंच , संस्थेचे मार्गदर्शक वीरकुमार दोशी ,संस्था सचिव प्रमोद दोशी ,अभिजित दोशी, बाहुबली दोशी, वैभव शहा सभापती नातेपुते, अभिजीत दोभाडा ,अमित गांधी, रामदास कर्णे सुरेश धाईंजे ,रवींद्र कुलकर्णी, मृणालिनी दोशी ,भाग्यश्री दोशी, विनयश्री दोशी, पूनम दोशी ,धनश्री दोशी ,पार्वती जाधव, सारिका राऊत ,इत्यादी सर्व कमिटी मेंबर्स मुख्याध्यापक दैवत वाघमोडे, विलाचंद्र मेहता आयटीआय कॉलेजचे, मुख्याध्यापक गजेश जगताप , रत्नत्रय अकॅडमी दहिगाव मुख्याध्यापक सतीश हांगे मुख्याध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक इत्यादी सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता गाढवे व आभार वनिता निंबाळकर यांनी मानले.