सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचा चालू गळितास आलेल्या उसाला पहिला हप्ता रुपये 2850/- शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचा चालू गळितास आलेल्या उसाला पहिला हप्ता रुपये 2850/- शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
रघुनाथ देवकर/आकाश भाग्यवंत नायकुडे
पिलीव प्रतिनिधी /मुंबई दिनांक 24 डिसेंबर 2024 :
सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचा 2024 -25 गळीत हंगामात गळितास आलेल्या उसाचा पहिला हप्ता रुपये 2850/- शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन एन. शेषागिरी राव आणि व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर – पाटील यांनी सांगितली.
सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याने शेतकरी, कामगार आणि सभासदांच्या विश्वासाने आपली यशस्वी परंपरा सुरू ठेवली आहे.
कारखान्याने आपल्या पारदर्शक वजन व्यवस्थेने, वेळेवर व नियोजनबद्ध होणाऱ्या ऊस तोडी आणि उत्कृष्ट आर्थिक व्यवहारांमुळे शेतकरी बांधवांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचार्यांनी कारखान्याच्या प्रत्येक निर्णयात शेतकऱ्यांचा फायदा केंद्रस्थानी ठेवला आहे. असे या निमित्ताने कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक उदय जाधव यांनी सांगितले.
कारखान्याचे उद्दिष्ट केवळ उसाला दर देण्यापुरते मर्यादित न राहता, शेतकऱ्यांच्या आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवणे हे आहे. आरोग्य शिबिरे, प्रशिक्षण वर्ग, आणि पर्यावरणपूरक विचारांची अंमलबजावणी यामुळे कारखान्याचा पाया अधिक भक्कम झाला आहे.
“सेवा निसर्गाची, उन्नती आपली” या ध्येयाने प्रेरित सद्गुरु श्री श्री साखर कारखाना, शेतकरी व ऊस उत्पादकांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर त्यांच्या समग्र प्रगतीसाठीही प्रयत्नशील आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून कारखान्याला उसाची नियमित पूर्तता करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
संचालक मंडळाचे चेअरमन एन. शेषागिरी राव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, व्यवस्थापकीय संचालक उदय जाधव, व त्यांच्या संपूर्ण टीमचे सभासद आणि शेतकऱ्यांतून कौतुक होत आहे. सद्गुरु श्री श्री साखर कारखाना शेतकरी बांधवांसोबत प्रामाणिकतेने पुढे वाटचाल करत राहील, याबाबतचा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.