ताज्या घडामोडी
पडळकर 卐 देवकते- पाटील शुभ विवाह सोहळा संपन्न
पडळकर 卐 देवकते- पाटील शुभ विवाह सोहळा संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 22 डिसेंबर 2024 :
देवराव सोपान पडळकर यांची नात व पोपट देवराव पडळकर राहणार पिंपरी बुद्रुक, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांची द्वितीय कन्या चि. सौ. कां. प्राजक्ता आणि बाबुराव ज्ञानदेव देवकते – पाटील यांचे नातू व तात्यासो बाबुराव देवकते – पाटील राहणार गारअकोले, तालुका माढा, जिल्हा सोलापूर यांचे जेष्ठ चिरंजीव अक्षय यांचा शुभविवाह सोहळा रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजून 47 मिनिट या गोपाळ मुहूर्तावर संपन्न झाला. गणेशतारा मंगल कार्यालय टाकळी (टें.) तालुका माढा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्यास सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नववधूवरांना शुभाशिर्वाद दिले.