श्रीराम कृषी महाविद्यालयीन कृषीदूतांचे झंजेवाडीत आगमन

श्रीराम कृषी महाविद्यालयीन
कृषीदूतांचे झंजेवाडीत आगमन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 17/12/2024 : महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या श्रीराम कृषी महाविदयालयातील चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या कृषीदूतांचे झंजेवाडी (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) या गावात आगमन झाले.
कृषी कार्यानुभव कार्यक्रम पुढील सहा महिने या गावात राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत कृषीदुत यांनी अळिंबी (Mushroom) लागवड याबद्दल प्रात्यक्षित राबवले. यामध्ये आळिंबी (Mushroom) लागवडी पासून ते काडणी पर्यंत च्या सर्व प्रक्रिया प्रा. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदुत यांनी समस्त गावकऱ्यांन समोर राबविल्या. गावातील शेतकऱ्यांचा भरपूर प्रमाणात प्रतिसाद लाभला. यावेळी झंजेवाडी गावचे प्रगतशील शेतकरी तसेच कृषीदूत अखिल फणसे, सुजल घनवट, शिवम भुजबळ, किरण कांबळे, अथर्व कुलकर्णी, राहुल ठोंबरे. उपस्थित होते. कृषिदुत यांना श्रीराम कृषी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, मार्गदर्शिका श्रीलेखा पाटील, विशेषकार्यकारी अधिकारी प्रमोद झगडे, महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. हरी हाके, उपप्राचार्य डॉ. सुरजकुमार राऊत, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक प्रशांत तरंगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.