संग्रामनगर येथे श्री शंकर महाराज व दक्षिणमुखी मारुती मंदिराचा कलशारोहण व श्री शंकर महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन

संग्रामनगर येथे श्री शंकर महाराज व दक्षिणमुखी मारुती मंदिराचा कलशारोहण व श्री शंकर महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 15/12/2024 : संग्रामनगर- अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथे प.पू. सद्गुरू श्री शंकर महाराज तसेच दक्षिणमुखी मारुती मंदिराचा कलशारोहणाचा व शंकर महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मंगळवार दिनांक 24 व बुधवार दिनांक 25 /12/2024 रोजी प.पू.श्रीपाद तिर्थ स्वामीजी महाराज यांचे हस्ते आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाचं औचित्य साधून त्या ठिकाणी “श्री शंकर गीता” ग्रंथाचा अडीच तासांचा सामुदायीक पारायण सोहळा आयोजित केला आहे.
*पारायण रुपरेषा*
1)व्यासपीठ चालीका कु.अनिता म्हेत्रे व सौ. कोमल नायकुडे.२)पारायण-मंगळवार दि.24.12.2024 रोजी वेळ सकाळी 9ते11.30. ३)दुपारी 12.महाआरती.वाचक, हजर भक्त्तगण या सर्वांना महाप्रसाद. ४)ग्रंथाची उपलब्धता फक्त 100असल्याने नाव नोंदीच्या क्रमानुसार वाचकांना प्राधान्य राहील. ५)वाचकांची संख्या वाढल्यास महिलांना प्राधान्य राहील. ६)इछुक वाचकाकडे स्वतःचा ग्रंथ असल्यास उत्तम. ७)आपली नाव नोंदणी श्री अवधूत कुलकर्णी 82 0878 0535 क्रमांकावर मेसेज द्वारा किंवा फोनवर करावी. ८)वाचकांसाठी भारतीय बैठकीबरोबरच टेबल खुर्चीचीही सोय करण्यात आलेली आहे. ९)वाचनापूर्वी चहापान होईल. १०)वाचनानंतर स्वतः वाचकांना ग्रंथ हवा असल्यास निम्म्या किमतीस रू.50/- ला रोखीने देण्यात येईल. ११)स्थळ माळशिरस रोड, डॉ. विद्युत शहा हॉस्पीटल समोर, अंहीसा मार्ग,जैन मंदिराजवळ, संग्रामनगर. अशी माहिती श्रीपाद सेवा मंडळ संग्रामनगर- अकलूज च्या वतीने देण्यात आली.