ताज्या घडामोडी

‼️ दळण्याचे जाते ‼️

‼️ दळण्याचे जाते ‼️

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 23/11/ 2024 : दोन हजार वर्षा पासून जाते प्रचारात असावे, असे मानण्यास आधार आहे. सिंधु संस्कृतीशी समकालीन आणि समान असलेल्या लोथल मधील उत्खननात जाते सापडली आहेत. तशाच तऱ्हेची जाते नेवासे, तडकोड, वडगाव, सिरपूर येथील उत्खननात मिळाली आहेत. नागार्जुन आणि तक्षशिला येथील उत्खननात जाती सापडली आहेत. नेवासे येथील उत्खननात तर अनेक जाती सापडल्या आहेत.
पिठाच्या गिरण्या सुरू होण्यापूर्वी आपल्या कुटुंब जीवनात जात्याला महत्त्वाचे स्थान होते. आजही खेड्यात पहाटेच्या प्रहरी जात्याचा घरघर आवाज येतो, आणि त्या घरघरी बरोबरच दळणाऱ्या स्त्रीच्या मुखातून स्त्रवणाऱ्या अमृतमधुर ओव्याही ऐकायला मिळतात. गाण्याने श्रम हलके होतात, म्हणून जात्यावर दळण दळताना स्त्रिया ओव्या म्हणत असत. या ओव्या अनेक अनामिका स्त्रियांनी सहजपणे रचलेल्या असतात. त्यात स्त्रीहृद्ययातील अनेक भावभावनांचे कल्लोळ व्यक्त झालेले दिसतात. एखादी जबाबदारी स्वीकारली कि ती पार पडण्यासाठी क्षमता आपोआप येते, हा भाव व्यक्त करण्यासाठी ‘जात्यावर बसल्यावर ओवी सुचते’ अशी म्हण मराठीत प्रचारात आलेली आहे.
पूर्वी ग्रामीण भागात वीज पोहोचली नव्हती. तेव्हा ग्रामीण भागातील स्त्रिया सकाळी भल्या पाहटे जात्यावर धान्य दळत असत. आधुनिक काळात जात्याची जागा विजेवर चालणाऱ्या गिरणी (चक्की) ने घेतली आहे. तरी आजही ग्रामीण भागात जाते वापरले जाते व लोकप्रिय आहे. जात्यावर अनेक कडधान्य ही भरडले जातात. धान्य जात्यात दळून त्याचे बारीक पीठ करतात. जाते आकाराने वर्तुळाकार गोल असते. जाते दगडाचे असून त्यामध्ये दोन तळ्या असतात. खालची तळी ही स्थिर असते. वरच्या तळ्याच्या कडेला एक उंच लाकडी खुंटा असतो. हा खुंटा हाती धरून वरची तळी फिरविता येते. या तळ्याच्या मध्यभागी असलेल्या छिद्रातून थोडे थोडे धान्य टाकतात. दोन्ही तळ्याच्या घर्षणामुळे त्या धान्याचे पीठ होऊन तळ्याच्या कडाच्या फटीतून बाहेर येते. जाते घडाळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरवले जाते. पूर्वीच्या स्त्रिया जात्यावर धान्य दळत असताना गाणी म्हणत, त्याला जात्यावरची ओवी असे म्हणत.

संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button