*श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या त्री शतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त* 💢 संगीत गाथा पारायण व श्री सोमनाथ महात्म्य ग्रंथ पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह

*श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या त्री शतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त*
💢 संगीत गाथा पारायण व श्री सोमनाथ महात्म्य ग्रंथ पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 20/11/2024 :
श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या 375 व्या (त्री शतकोत्तर अमृत महोत्सव) वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज संगीत गाथा पारायण व श्री सोमनाथ महात्म्य ग्रंथ पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे तालुका बारामती जिल्हा पुणे येथे आयोजन करण्यात आलेले आहे.
सोमवार दिनांक 2 डिसेंबर 2024 ते सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2024 या कालावधीत संपन्न होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाची दैनंदिन रूपरेखा याप्रमाणे आहे.
दररोज पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 6 ते 7 लघुरुद्र अभिषेक, सकाळी 7:30 ते 11:30 गाथा पारायण, दुपारी 12 वाजता आरती व संत पंगत. दुपारी 3 ते 5 गाथा पारायण, सायंकाळी5 ते 6:30 हरिपाठ, सायंकाळी 7 ते 9 कीर्तन, रात्री 9 वाजता श्रींची आरती नंतर संत पंगत.
या धार्मिक सप्ताहाचे व्यासपीठ चालक ह.भ.प. सचिन महाराज महामुनी, हरिपाठ कीर्तन साथ मृदुंगनाथ अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था डोर्लेवाडी (मृदुंग विशारद पांडुरंग महाराज शिंदे), ह.भ.प. बाळासाहेब दळवी व सोमेश्वर पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ किर्तनास साथ करतील.
दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी काल्याचा महाप्रसाद ऋषिकेश (काका) नंदकुमार घोलप व धन्यकुमार बाबासो मोकाशी करंजे यांच्या वतीने आहे.
*किर्तन सेवा*
सोमवार दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी ह भ प संजय महाराज वाबळे (देऊळगाव रसाळ), दिनांक 3 डिसेंबर हभप हरी महाराज नामदास (पंढरपूर), 4 डिसेंबर ह भ प चंद्रकांत महाराज वांजळे (पुणे), दिनांक 5 डिसेंबर ह भ प बापू महाराज टेंगले (राहू), दिनांक 6 डिसेंबर ह भ प महादेव महाराज राऊत (बीड), दिनांक 7 डिसेंबर हभप अमय महाराज शिंदे (वीर), दिनांक 8 डिसेंबर ह भ प तुकाराम महाराज शास्त्री मुंडे (बीड), दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी ह भ प शामसुंदर महाराज ढवळे (दौंड) यांचे काल्याचे किर्तन होईल. तसेच शनिवार दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9:30 ते 11:30 या वेळेत “नाचू भारुडाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी” भारुडकार ह भ प लक्ष्मण महाराज राजगुरू (बावडा) यांचा भारुड कार्यक्रम होईल. अशी माहिती श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचे सर्व सभासद व पुजारी वर्ग यांनी साप्ताहिक अकलूज वैभव आणि पाक्षिक वृत्त एकसत्ता ला सांगितली.