सावंत-पाटील 卐जाधव-पाटील शुभविवाह सोहळा संपन्न
सावंत-पाटील 卐जाधव-पाटील शुभविवाह सोहळा संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 17/11/ 2024 :
श्रीमती तारामती व कै. दादासाहेब श्रीरंग सावंत-पाटील यांचे नातू आणि सौ सिंधू व श्री सुनील दादासाहेब सावंत पाटील राहणार कोळेगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांचे सुपुत्र श्रीधर आणि चि. सौ. कां. श्वेता( सौ शालन व श्री सिद्धेश्वर तुळशीराम जाधव-पाटील यांची नात व सौ उज्वला व श्री सतीश सिद्धेश्वर जाधव पाटील राहणार मळवली, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांची सुकन्या) यांचा शुभविवाह रविवार दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी अत्यंत थाटाने संपन्न झाला.
कृष्णाई मंगल कार्यालय तांदुळवाडी येथे दुपारी 12 वा.11 मि. या शुभ मुहूर्तावर संपन्न झालेल्या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नववधूवरांना शुभाशीर्वाद देऊन सदिच्छा व्यक्त केल्या.
सद्गुरू श्री श्री साखर कारखाना लि श्रीनगर राजेवाडी चे चेअरमन एन. शेषागिरी राव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, व्यवस्थापकीय संचालक उदय जाधव यांचे सह अनेक दिग्गज या सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते.