मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 16/01/2026 :
आपण प्रत्येकजण आपली वैयक्तिक स्वच्छता व कौटुंबिक स्वच्छता या बाबतीत जागरूक असतो. काहीजण परिसर स्वच्छ रहावा यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र पूर्णपणे सर्वत्रच स्वच्छता रहावी यासाठी अगदीच थोडे लोक जागरूक असतात.
आपण घरात वस्तू जागच्या जागी ठेवतो. कचरा कचऱ्याच्या डब्यात टाकतो. बाहेर गेल्यावर मात्र काही खाल्ले किंवा प्याले की डबे, बाटल्या कुठेही फेकतो, रस्त्यावर थुंकतो, उघड्यावर मैला विसर्जन करणे याचे काहीच वाटत नाही.
स्वतःला सुशिक्षित समजणारे अडाणी ओढे, नद्या, समुद्र वगैरे मध्ये अगदी चालत्या गाड्यांमधून कचऱ्याच्या पिशव्या टाकतात. त्यामध्ये निर्माल्यापासून उरलेले अन्न, नको असलेल्या वस्तू-कपडे असे काहीही असते.
आजचा संकल्प
प्रत्येक गोष्ट सरकारवर ढकलण्यापेक्षा आपण प्रत्येकजण सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेला जास्त महत्व देऊ व आपले आरोग्य जपू.
सौ. स्नेहलता स. जगताप
