शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अविष्कार 2025 चे आयोजन

शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अविष्कार 2025 चे आयोजन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 08/11/2024 :
रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे अंतर्गत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्च शंकर नगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विभागीय स्तरावरील आविष्कार 2025 या संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही संशोधन स्पर्धा महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहेत. या स्पर्धेमध्ये ॲग्रीकल्चर अँड ऍनिमल हजबंडरी, कॉमर्स मॅनेजमेंट अँड लॉ, इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, ह्युमॅनिटीज लैंग्वेज अँड फाईन आर्ट, मेडिसिन अँड फार्मसी, प्युअर सायन्स या विभागांतर्गत प्रोजेक्ट आणि पोस्टर प्रेझेंटेशन या स्पर्धा होणार आहेत. यामध्ये पुणे सोलापूर व अहिल्यानगर विभागातील विविध महाविद्यालय व विद्यार्थी सहभागी होणार आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली. अविष्कार संशोधन स्पर्धेचे समन्वयक म्हणून विभाग प्रमुख प्रा. अनिल कोकरे व प्रा. लक्ष्मी काळे काम पाहणार आहेत. तरी जिल्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेतील पोस्टर व प्रोजेक्ट सादरीकरण पाहण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव राजेंद्र चौगुले यांनी केले आहे.