ताज्या घडामोडी
जालिंदर निवृत्ती नाईकनवरे यांचे निधन

जालिंदर निवृत्ती नाईकनवरे यांचे निधन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
अकलूज : श्रीपुर (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील जालिंदर निवृत्ती नाईकनवरे (वय 75 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
अत्यंत मनमिळावू स्वभावाचे अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले कै. जालिंदर निवृत्ती नाईकनवरे हे श्री चंद्रशेखर विद्यालयाचे माजी सेवक (नाईक) होते. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. पत्रकार दत्ता नाईकनवरे सरांचे ते वडील होत. अंत्यविधी गुरुवार दिनांक 7 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी झाला.