सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये डिस्टीलरी व ॲसेटीक ॲसिड प्रकल्प उत्पादनाचा शुभारंभ संपन्न

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये
डिस्टीलरी व ॲसेटीक ॲसिड प्रकल्प उत्पादनाचा शुभारंभ संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 6/11/2024 : शंकरनगर अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये सन 2024-25 चा डिस्टीलरी व ॲसेटीक ॲसिड प्रकल्प उत्पादनाचा शुभारंभ सोमवार दि.04/11/2024 रोजी सकाळी 11.10 वाजता कारखान्याचे मार्गदर्शक संचालक विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
डिस्टीलरी व ॲसेटीक ॲसिड प्रकल्प उत्पादनाचा शुभारंभानिमित्त सकाळी 10:15 वाजता श्रीसत्यनारायण महापूजा कारखान्याचे संचालक संग्रामसिंह अजितसिंह जहागिरदार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.याज्ञसेनादेवी संग्रामसिंह जहागिरदार या उभयतांचे हस्ते संपन्न झाली.
सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील, संचालक लक्ष्मण शिंदे, नानासाहेब मुंडफणे, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, डॉ.सुभाष कटके, रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालक – प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत-पाटील, संचालिका सुजाता शिंदे, शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक – पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, सौ.हर्षाली निंबाळकर तसेच कार्यकारी संचालक-राजेंद्र चौगुले व खातेप्रमुख तसेच कामगार उपस्थित होते.