असिस्टंट रीजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर संभाजीराव गावडे यांचा सन्मान

असिस्टंट रीजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर संभाजीराव गावडे यांचा सन्मान
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथे आर.टी.ओ. इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत असलेले संभाजीराव ईश्वर गावडे यांची याच ठिकाणी असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर (A.R.T.O.) या पदावर प्रमोशन द्वारे नियुक्ती झाल्याबद्दल साप्ताहिक गावकुस, साप्ताहिक अकलूज वैभव, पाक्षिक वृत्त एकसत्ता च्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात येऊन भावी कारकीर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या. वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन राष्ट्रीय सल्लागार समिती राष्ट्रीय अध्यक्ष व भारतीय राष्ट्रवादी पार्टी चे राष्ट्रीय सचिव आणि नॅशनल युनियन बॅकवर्ड एस सी. एस टी अँड मायनॉरिटी महासंघ नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य संपर्क व प्रसिद्धी प्रमुख भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ पत्रकार विष्णू भाऊ बिचकुले यांचे प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न झाला. वृत्त एकसताचे कार्यकारी संपादक विलासनंद विठ्ठल गायकवाड यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.
सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संभाजीराव ईश्वर गावडे यांचा सत्कार साप्ताहिक गावकुस, साप्ताहिक अकलूज वैभव आणि पाक्षिक वृत्त एकसत्ता यांच्या वतीने करण्यात आला त्यावेळी टिपलेल्या छायाचित्रात संभाजीराव ईश्वर गावडे, भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, विष्णू भाऊ बिचकुले
छायाचित्र : विराज अरविंद माने