ताज्या घडामोडी

साखर कारखानदारीतील आदर्श व्यक्तीमत्व म्हणजेच चेअरमन बाबुरावजी बोत्रेपाटील

साखर कारखानदारीतील आदर्श व्यक्तीमत्व म्हणजेच चेअरमन बाबुरावजी बोत्रेपाटील
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 31/10/ 2024 :
ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबूरावजी दादासाहेब बोत्रेपाटील, संचालिका रेखाताई बोत्रेपाटील, संचालक प्रशांतराव बोत्रेपाटील यांनी गेल्या पाच वर्षापूर्वी चांदापुरी ता.माळशिरस जि.सोलापूर येथील बंद अवस्थेत असणारा कारखाना ताब्यात घेऊन ओंकार साखर कारखाना परिवाराची मुहर्तमेढ रोवली. गेल्या पाच वर्षांपासून चेअरमन बाबूरावजी बोत्रेपाटील यांनी अहोरात्र मेहनत घेतली. आज त्या कष्टाचे फळ पाहण्यास मिळते. ओंकार परिवाराचे वटवृक्षात रुपांतर झाले. आजच्या घडीत ओंकार परिवाराची नऊ युनिट झाली आहे. एका शेतकरी कुटुंबातील मुलाने हे वैभव उभे केले आहे हि सामान्य बाब नाही.
चांदापुरी, निलंगा, म्हैसगाव, हिरडगाव, तडवळ, अंबुलगा, देवदैठण, फराळे, शहादा या ठिकाणी कारखाने ताब्यात घेऊन त्या भागातील लोकांचे जीवनमान उंचाविले व आर्थिक प्रगती साधली. शेतकऱ्यांचा त्या भागातील उसाचा प्रश्न संपविला व कामगाराच्या हाताला काम उपलब्ध करून दिले.
बाबूरावजी बोत्रे पाटील यांची मांडवगण फराटा ता. शिरूर जि. पुणे येथील ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली आहे. त्यांनी कृषि क्षेत्रात पदवी प्राप्त केल्यानंतर धाडसाने अनेक उद्योगात पदार्पन केले व ते यशस्वी करून दाखवले त्यानंतर न परवडणाऱ्या अतिशय आव्हानात्मक अनेक समस्याचा सामना करावा लागनाऱ्या साखर उद्योगात उतरले. त्यांनी मनाशी ठरविले कि जे करायचे ते सर्व उत्तम करू. आजच्या घडीला त्यांनी नऊ कारखाने ताब्यात घेतले ज्या ठिकाणी उपपदार्थ प्रकल्प नाहीत त्या ठिकाणी नवीन प्रकल्प कार्यान्वित करून घेतले. त्या शिवाय भविष्यात मी माझ्या शेतकऱ्यांना व कामगारांना न्याय का देऊ शकत नाही हि भूमिका घेऊन काम हाती घेतले अथक मेहनतीतून यश येण्यास सुरवात झाली कि यशाला शॉर्ट कट नसतो व यूटर्न ही नसतो. साखर कारखानदारीत अलीकडच्या काळात बोत्रेपाटील यांनी दबदबा निर्माण केला.
ओंकार साखर कारखाना परिवाराने ज्या भागातील कारखाने बंद होते त्या भागातील कारखाने सुरु केले. त्या परिसराला कारखाने बंद असल्याने मरगळ आली होती. कारखाने सुरु केल्यानंतर त्या परिसराला किबहुना गावाला तालुक्याला जिल्हयाला व तेथील कामगारांना व्यावसाइकामध्ये नवचैतन्य बहाल करून आलोकिक किमया परिवाराने केली.
चेअरमन बाबुराव (आप्पा) बोत्रेपाटील यांनी फक्त साखर उत्पादन केले नाही तर साखरेबरोबर सामाजिक उपक्रम राबवुन आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो, हे दाखवून दिले. त्यामध्ये प्रत्येक युनिट मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेऊन संगोपनाची जबाबदारी घेतली कारखाना परिसरातील जि. परिषद शाळेत मुलांना खाऊ वाटप, गणवेश, शालेय साहित्य वाटप करून थंडीत आर्थिक परिस्थिती कुमकुवत असणाऱ्या मुलांना स्वेटर चे वाटप करून मायेची उब दिली. अनाथ निराधार लोकांना अन्नधान्याचे कीट मोफत वाटप केले. त्याबरोबर प्रत्येक युनिट मधील कष्टकरी सामान्य शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या उदेशाने शेतकऱ्यांना कर्मचार्‍यांना मोफत साखर वाटप केली.भविष्यात साखर कारखानदारी टिकवयाची असेल तर प्रत्येक ठिकाणी उपपदार्थ प्रकल्प हाती घेतले आहेत. जेणे करून शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त दर देण्याबाबत ओंकार परिवार कटीबद्ध आहे. परिवाराने या अगोदर हि उसाला समाधानकारक दर दिला आहे. त्या भागातील कारखान्याच्या तुलनेत उसाला जास्त दर देण्याचा प्रयत्न केला आहे. ओंकार साखर कारखाना परिवाराने शेतकऱ्यांच्या जीवनमानात उत्साह आणला.
ओंकार साखर कारखान्याने ऊसदरा बाबत व सामाजिक क्षेत्रातही उत्तुंग भरारी घेतली.
“ओंकार साखर कारखाना परिवारातील शेतकऱ्यांना व कामगारांना कारखान्याकडून जेजे देणे शक्य आहे ते देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न परिवाराचा राहील”- चेअरमन बाबूरावजी बोत्रेपाटील

शब्दाकन
रामचंद्र सर्जेराव मगर (पत्रकार
निमगाव (म) ता. माळशिरस

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button