ताज्या घडामोडी

“सदगुरु श्री श्री साखर कारखाना” 13 वा बॉयलर अग्नी प्रदिपन सोहळा संपन्न. संपन्न 💢 7 लाख मॅट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

“सदगुरु श्री श्री साखर कारखाना”  13 वा बॉयलर अग्नी प्रदिपन सोहळा संपन्न

💢 7 लाख मॅट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क 
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 23/10/2024 :सांगली, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील सद्गुरु श्री श्री रविशंकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजेवाडी (श्री श्रीनगर) येथील “सद्गुरु श्री श्री साखर कारखाना” बॉयलर अग्नी प्रदिपन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचा चालू वर्षीच्या ऊस गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन कारखान्याचे चेअरमन एन शेषागिरी राव यांचे शुभहस्ते व व्हॉइस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, व्यवस्थापकीय संचालक उदय जाधव, रत्नशेखर राव, संचालक मोहन बागल, सौ. उषाताई मारकड यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये झाला. प्रारंभी कारखान्याच्या कार्यस्थळी आयोजित केलेल्या होम हवन प्रसंगी कापरे गुरुजी यांनी धार्मिक विधी व पौरोहित्य केले.
यावेळी राजेवाडीचे लोकनियुक्त सरपंच कैलास शिरकांडे, कांतीलाल नाईकनवरे, जनरल मॅनेजर रेड्डी, हरिबाबु, एच आर एन एडमिन सचिन खटके, सर्व खाते प्रमुख तसेच सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील असंख्य सभासद बांधव, वाहन चालक, मालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कारखान्याची संपूर्ण माहिती केन मॅनेजर सुनील सावंत यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली. तर उदय जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून उपस्थित शेतकरी बांधव व सभासदांना कारखान्याची सर्व पार्श्वभूमी ते आत्तापर्यंतच्या प्रगतीपूर्ण वाटचालीबाबत इथंभूत माहिती सांगून “आपल्या सर्व एकनिष्ठ सभासद बांधवांना दीपावली निश्चितपणे गोड होईल या पद्धतीचा निर्णय आपला सद्गुरु परिवार घेणार आहे अशी खात्री दिली”. तर आपल्या अध्यक्षीय भाषणातून एन शेषागिरी राव यांनी “आपल्या या कारखान्याच्या जडणघडणीमध्ये सर्व संचालक मंडळ ,सभासद ,शेतकरी बांधव, वाहन चालक मालक, सर्व खाते प्रमुख, कामगार कर्मचारी या सर्वांनीच आत्तापर्यंत जे सहकार्य दिलेल आहे त्यामुळे आपण प्रगतीकडे वाटचाल करीत आहोत त्याप्रमाणेच भविष्यात सुद्धा सहकार्य करा असे”” आव्हान करून सर्वांना धन्यवाद दिले. सूत्रसंचालन रघुनाथ देवकर यांनी केले तर आभार कोळेकर यांनी मानले. सर्व उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button