ताज्या घडामोडी

चुलत जावेस विष पाजल्या प्रकरणी दोन महिलांना अटकपूर्व जामीन मंजूर

चुलत जावेस विष पाजल्या प्रकरणी दोन महिलांना अटकपूर्व जामीन मंजूर

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क

सोलापूर प्रतिनीधी ,- रोहिणी अमोग्सिध पवार व सायली अवधूत पवार रा. कुरुल, तालुका मोहोळ या दोघींची चुलत जावेस विष पाजल्याप्रकरणी सोलापुर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी रुपये १५,०००/- च्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजुर केला.
यात हकिकत अशी की, फिर्यादी यांचा त्यांची चुलत सासू व चुलत जावा यांचेशी किरकोळ कारणावरून वाद होता. दि. १६/०८/२०२४ रोजी सकाळी ९.३० वा. चे सुमारास फिर्यादी स्वताच्या घरासमोर धुणे-भांडे करीत असताना त्यांची चुलत सासू हि तेथे येऊन तू इथे धुणे-भांडे करायचे नाही असे म्हणून फिर्यादीशी वाद घालू लागली त्यावर फिर्यादीने धुणे-भांडे करायची आमची जागा दाखवा असे म्हणल्यावर फिर्यादीची चुलत सासू म्हणाली तुमची जागा दाखवायला मी काय मोकळी आहे का असे म्हणून फिर्यादीला घाण घाण शिविगाळ करू लागली व तो वाद चालू असताना फिर्यादीच्या चुलत जावा रोहिणी पवार व सायली पवार तेथे आल्या व फिर्यादी यांना शिव्या देऊ लागल्या व त्यानंतर फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर थोड्या वेळाने फिर्यादी च्या घरी कोणी नसताना फिर्यादी यांची चुलत सासू व चुलत जावा यांनी पुन्हा त्यांच्या अंगणात जाऊन शिवीगाळ करून फिर्यादी बाहेर आली असता फिर्यादी यांच्या चुलत सासू यांनी फिर्यादीचे हात धरले व चुलत जावा रोहिणी व सायली यांनी मिळून फिर्यादी यांच्या अंगणात ठेवलेले विषारी कीटकनाशक फिर्यादी यांना जबरदस्तीने पाजून निघून गेले. त्यानंतर त्रास होत असल्यामुळे फिर्यादी यांना उपचाराकरिता त्यांच्या पतीने हॉस्पिटल मध्ये दाखल केले. अशा आशयाची फिर्याद कामती पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती.
यातील आरोपी नामे रोहिणी अमोग्सिध पवार व सायली अवधूत पवार रा. कुरुल, तालुका मोहोळ या दोघींनी अटकेच्या भीतीने अटकपूर्व जामीन मिळणेकामी अॅड. अभिजीत इटकर व अॅड. गौरंग काकडे यांच्यामार्फत सोलापुर येथील सत्र न्यायालय येथे जामीनासाठी अर्ज दाखल केला.
यात आरोपीतर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, आरोपीच्या वकिलांनी स्टमक फ्लश (पिडीतेच्या पोटातील द्रवाच्या) रासायनिक पृथ्कारणाचा रिपोर्ट मागवून घेण्यची विनंती केली त्याप्रमाणे मा. कोर्टाने सदरचे प्रमाणपत्र मागवून घेतले व असा कुठलाच प्रकार घडलेला नसल्यामुळे असे ते प्रमाणपत्र मा. कोर्टाच्या पटलावर येणे महत्वाचे होते व त्याप्रमाणे ते आले व त्या रासायनिक पृथ्कारणाचा रिपोर्ट मध्ये पिडीतेच्या पोटामध्ये कुठल्याही प्रकारचे विषारी पदार्थ आढळून आला नाही त्यामुळे पिडीतेने तिला जबरदस्तीने विष पाजल्याचा बनाव केला असून फक्त त्रास देण्याच्या उद्देशाने सदरची फिर्याद दाखल केली आहे असा युक्तिवाद मा. कोर्टाने मान्य केला.
सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरुन मा. सत्र न्यायाधीश यांनी आरोपी नामे रोहिणी अमोग्सिध पवार व सायली अवधूत पवार रा. कुरुल, तालुका मोहोळ या दोघींची जामीनावर मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड गौरंग काकडे, ॲड फैय्याज शेख, ॲड शिवाजी कांबळे ,ॲड सुमित लवटे, यांनी काम पाहिले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button