सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी संपन्न

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक : 2/8/2025 :
अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
महाविद्यालायाच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाचे लिपिक बाबासाहेब वाघमारे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात परिचय करुन दिला.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.प्रविण ढवळे, महाविद्यालयाचे समन्वयक, कार्यालयीन अधीक्षक, सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शैलेंद्र फुले यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी काम पाहीले.