ताज्या घडामोडी

सोलापूर जिल्हा (ग्रामीण) सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पारितोषिक वितरण

सोलापूर जिल्हा (ग्रामीण) सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पारितोषिक वितरण

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 11/10/ 2024 : सोलापूर जिल्हा (ग्रामीण) सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करताना ॲडिशनल एसपी प्रीतम यावलकर, नामदेव शिंदे (पोलीस निरीक्षक, जी.वि.शा.), भानुदास निंभोरे (पोलीस निरीक्षक अकलूज पोलीस ठाणे), नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी दिल्ली अर्थात एन.यू.बी.सी. चे महाराष्ट्र राज्य संपर्क व प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे हे उपस्थित होते.
दिनांक 7/ 9 /2024 ते 17/9/ 2024 या कालावधीत साजरा करण्यात आलेल्या श्री गणेश उत्सवातील सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाबरोबरच उत्तेजनार्थ चार अशा एकूण सात सर्वोत्कृष्ट गणेश मंडळांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
संवाद हॉल पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमास सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका वळसंग माढा करकंब सांगोला करमाळा अकलूज पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण मधील सर्व अधिकारी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट गणेश उत्सव मंडळं :-
प्रथम क्रमांक :- श्री जगदंबा गणेशोत्सव सांस्कृतिक व सार्वजनिक क्रीडा मंडळ कसबा पेठ कानडे गल्ली माढा (उपविभाग बार्शी) अध्यक्षाचे नाव : महेश नारायण भांगे

द्वितीय क्रमांक :- आजोबा महागणपती गणेश मंडळ महादेव गल्ली सांगोला (उपविभाग मंगळवेढा)
अध्यक्षांचे नाव :- रविकिरण सावळाराम चौगुले

तृतीय क्रमांक :- श्री शिवछत्रपती गणेश उत्सव मंडळ शिवाजीनगर श्रीपूर (उपविभाग अकलूज) अध्यक्षांचे नाव :- दत्तात्रय विक्रम दोरगे

उत्तेजनार्थ 4 गणेश उत्सव मंडळं
उत्तेजनार्थ प्रथम : श्री महात्मा बसवेश्वर तरुण गणेश मंडळ वळसंग (उपविभाग अक्कलकोट) अध्यक्षांचे नाव :- कल्याण स्वामी

उत्तेजनार्थ द्वितीय :- शिवरत्न सामाजिक व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था गणेश तरुण मंडळ थोरली वेस करकंब (उपविभाग पंढरपूर) अध्यक्षांचे नाव :- विनायक धोंडीबा राजगुरू

उत्तेजनार्थ तृतीय :- शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळ बीबीदारफळ (उपविभाग सोलापूर) अध्यक्षांचे नाव :- संतोष शहाजी साठे

उत्तेजनार्थ तृतीय :- श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ सावंत गल्ली करमाळा (उपविभाग करमाळा) अध्यक्षाचे नाव संदीप दुधाळ

आदर्श गणेश उत्सव संकल्पना राबवून समाजामध्ये अभिमानास्पद काम केल्याने सार्वजनिक गणेश मंडळांना सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

नामदेव शिंदे (पोलीस निरीक्षक जि. वि. शा.) आणि रेल्वे पोलीस मुख्यालयातील ए .एस. आय. अनिल शिर्के यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कारासह टिपलेले छायाचित्र

जिल्हास्तरीय तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विजेते मंडळ श्री शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ शिवाजीनगर श्रीपूर

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button