रानभाजी – कवला

रानभाजी – कवला
शास्त्रीय : Smithia Sensitiva
इंग्रजी : Sensitive Smithia
इतर नावे : कवळा, कौला
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 07/10/ 2024 : कवला वनस्पती ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेने सर्रास आढळते. या भाजीचा कालावधी जून ते ऑगस्ट महिन्या पर्यंत असतो. कवला हे लाजाळू सारखे संयुक्त बारीक पाने असलेले फूटभर वाढणारे झुडूप आहे. या झुडूपाच्या पानांवर दाब पडल्यास पाने मिटतात. कवळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते.
पाककृती
# साहित्य – १ जुडी कवळ्याची भाजी, १ मोठा कांदा, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, १ छोटा चमचा हिंग, १ छोटा चमचा हळद, मीठ, खवलेले खोबरे आवडीनुसार, फोडणीसाठी तेल.
# कृती – प्रथम कवळ्याची कोवळी पाने स्वच्छ धुऊन बारीक कापावी. कांदा बारीक कापावा. फोडणीसाठी तेल गरम करून त्यात हिरवी मिरची, हिंग, कांदा परतून घ्यावा. त्यानंतर हळद घालून भाजी शिजत ठेवावी. सर्वात शेवटी मीठ आणि ओले खोबरे घालून परतावे.
संदर्भ : इंटरनेट/नम्रता मांजरेकर
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
रानभाजी या लेखातील ही शेवटची पोस्ट. आशा करतो की, सर्वांना रानभाजी बद्दल विशेष माहिती आवडली असेल. धन्यवाद !_