सोलापूरसह पाच जिल्ह्यातील 1194 चारा छावण्यांमध्ये कोट्यवधींचा चारा घोटाळा 7.92 कोटींचा दंड वसूल.!

- सोलापूरसह पाच जिल्ह्यातील 1194 चारा छावण्यांमध्ये कोट्यवधींचा चारा घोटाळा 7.92 कोटींचा दंड वसूल.!
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 05/10/ 2024 :
मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशानुसार महाराष्ट्र शासनाकडून कडून फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला पुणे विभागीय आयुक्तालया सह, पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रांत व तहसीलदारांकडून अवमान केल्याने संबंधितांचे विरोधामध्ये आवमान याचिका दाखल करण्याचा जनहित याचिका करते विठ्ठल राजे पवार, गोरख घाडगे यांचा इशारा, बाबत पुणे विभागीय आयुक्त यांना दिले निवेदन.
याबाबत सविस्तर माहिती असे की सन 2012-13 व 13-14 या कालावधीत राज्यातील अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, बीड या पाच जिल्ह्यात सुमारे 1273 छावण्या द्वारे चारा डेपो सुरू करण्यात आले होते. सदर सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांमध्ये प्रचंड तफावत, अनियमित्तता आढळून आल्याने संघटनेने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. त्यामुळे राज्यातील सर्वात मोठा चारा घोटाळा बाहेर आला आहे. याचिकाकर्ते विठ्ठल राजे पवार व गोरख गाडगे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे हा भ्रष्टाचार बाहेर आला. यामध्ये मोठ मोठी राजकीय धेंड अडकल्याने महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
मुंबई हायकोर्टच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने 6 सप्टेंबर 2017 रोजी जनहित याचिका क्रमांक 164-13 नुसार कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून भारतामध्ये एकाच केस मध्ये 1194 दोशींवर झालेल्या दंडात्मक कारवाई मुळे राज्यातील सर्वात मोठा चारा घोटाळा बाहेर आला आहे. याचिकाकर्त्याच्या म्हणण्याने खरे तर ही बाब ग्रीनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड होईल इतका मोठा चारा घोटाळा, सोलापूर बीड अहमदनगर सातारा व सांगली या पाच घडलेला असून यामध्ये मोठा दंडही झालेला असून तो वसूल केलेला आहे. राज्याच्या या जिल्ह्यातील साधारण 19 आमदार 40 ते 50 चेअरमन जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती तर अनेक सोसायटीचे चेअरमन व संस्थाचालक अशा एकूण 1075 चारा छावणी संस्थाचालकांनी अनिमित्त केल्याने जनहित याचिकेमुळे त्यांना 7.92 कोटीचा दंडही झालेला असून तो महसूल विभागाद्वारे वसूलही करण्यात आला आहे. युवाम अत्यंत महत्त्वाची व गुन्हेगारीला पुष्टी देताना न्यायालयाने केलेल्या आदेशानंतर जबर चारा घोटाळ्यातील आरोपी गळाला लागलेले आहेत असे असताना भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील चारा घोटाळ्यातील चारा छावण्याची कोट्यावधी रुपयाची बिले कसे काढू शकतात.? असे याचिका करते विठ्ठल राजे पवार व गोरख घाडगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर सोलापूर सातारा सांगली बीड या जिल्ह्यात सुमारे 1273 छावण्या डेपो सुरू करण्यात आले होते त्या चारा छावण्यांमध्ये प्रचंड अनिमित्त 55 हजार टँकर पाच लाखांहून अधिक पशुधन छावणीवर होते, त्यामध्ये मोठी तफावत अनियमित्ता आढळून आल्याने चौकशीचे आदेश दिल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील ४२६ सोलापूर जिल्ह्यातील 193 व 278 सांगली जिल्ह्यातील तर १४६ सातारा जिल्ह्यातील व 151 बीड जिल्ह्यातील चारा छावण्या आदेशातील अटी व शर्ती पूर्णतः पालन न केल्यामुळे विविध बाबीं पोटी व नियमित्तता केलेल्या संस्था चालकांना एकूण 7.92 कोटी रुपयाचा दंड करण्यात आला आहे. व सर्व दंड वसूल देखील करण्यात आलेला आहे, सर्व पुराव्यासह सर्व गुन्हे शाबित झाल्याने संबंधितांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे त्यानुसार चारा छावण्या डेपोचालक यांच्यावर कठोर कारवाई व फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत शासनाने तात्काळ पोहचदरी गुन्हे दाखल करण्याच्या आदेश दिलेले आहेत असे असताना पाचही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अद्यापही फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भात साल डकल केल्याने शासन आदेश व न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याचा याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे, मुंबई उच्च न्यायालय व राज्य सरकारने काढलेल्या शासन आदेशाचा अवमान झाल्याची खंत याचिका कर्ते विठ्ठल राजे पवार व गोरख आनंद घाडगे यांनी पुणे येथे पुणे विभागीय आयुक्त यांना निवेदन देताना निषेध व्यक्त केले.
सन 2012-13 व 13-14 व 2018-19 मध्ये राज्य सरकारच्या वतीने सुरू केलेल्या चारा छावण्यांमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्यामुळे संतप्त झालेल्या संघटनेने वारंवार तक्रार करून देखील जिल्हाधिकारी व शासन प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार व गोरख आनंदा घाडगे यांनी संयुक्तपणे मुंबई उपन्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये १२७३ चारा छावण्या वरती पाच लाखांहून अधिक जनावरे 55 हजार टँकरद्वारे पाणीपुरवठा यासाठीची नियम अटी शासनाने घालून दिलेल्या अभंग करून 1075 चारा छावण्या चालकांनी अनियमित्ता केल्या होत्या त्यामुळे न्यायालयाने अनियमित्ता केलेल्या चारा छावण्या संस्थेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यानुसार सातारा सांगली सोलापूर अहमदनगर व बीड जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या याचिकेवर दिले आहेत.]* विभागीय आयुक्त व पाठ यांनी पाचही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा संघटना शासन प्रशासन पुणे विभागीय आयुक्तांचे पाचही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांत यांच्या विरोधामध्ये अवमान याचीका दाखल करण्याचा इशारा शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ अध्यक्ष विठ्ठल राजे पवार व घाडगे यांनी दिला.