ताज्या घडामोडी

रानभाजी – चवळीचे बोके

रानभाजी – चवळीचे बोके

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 05/10/ 2024 : चवळीच्या वेलीच्या टोकांना कोकणात ‘बोके’ म्हणतात. या टोकांचीही भाजी केली जाते. तंतुमय अशा सारक भाजीची चव काहीशी तुरट असते. चायनीज स्पिनच, काऊ-पी, चवळी किंवा चवळीची पानं, अमरनाथ लिव्हज अशा विविध नावांनी चवळीची भाजी ओळखली जाते. चवळी मध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, लोह, कॅल्शियम, प्रथिने यासारखे बरेच पोषक घटक असतात. विशेष म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चवळी फायदेशीर आहे.
पोटासाठी फायदेशीर : चवळीची भाजी खाणे पोटातील आजारांसाठीही फायदेशीर आहे. हे बद्धकोष्ठता आणि पोट संबंधित इतर समस्यांना दूर करण्यास मदत करते. हे पाचक प्रणाली मजबूत करते. पोटाच्या अनेक समस्यांसाठी चवळी फायदेशीर आहे.
वजन कमी करण्यासाठी : चवळीचे सेवन केल्याने शरीरातील इन्सुलिनची पातळी कमी होते. चवळी खाल्ल्यानंतर बर्‍याच वेळ पोट भरल्या सारखे वाटते. यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे. त्यांनी आपल्या आहारात चवळीचे सेवन अवश्य करावे.
केसांसाठी : चवळी मध्ये लायझिन आणि अ‍ॅमीनो अ‍ॅसिड असते. हे केसांसाठी फायदेशीर आहे. याचा उपयोग केल्याने केस काळे राहतात. चवळीचा रस पिल्याने केस गळतीचा त्रास देखील कमी होतो. ताज्या पानांचा नियमित रस प्यायल्याने केस गळणे किंवा अकाली पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते.
त्वचेसाठी : चवळी त्वचेसाठी फायदेशीर आहे. जर आपण ते त्वचेवर लावले तर खाज सुटणे बंद होते. चवळीचा आहारात समावेश केलातर त्वचा चमकदार होते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते : चवळी मध्ये व्हिटॅमिन-सी आणि प्रथिने असतात. ते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. हे संक्रमण रोग होण्यापासून रोखतात.
डोळ्यांसाठी : चवळी मध्ये जीवनसत्व-सी आणि ए असते. निरोगी डोळ्यांसाठी शरीरात याची कमतरता असू नये.
हाडे मजबूत करण्यासाठी : हाडे मजबूत करण्यासाठी भरपूर कॅल्शियमची आवश्यक असते. चवळी मध्ये भरपूर कॅल्शियम असतात. चवळीचे नियमित सेवन केल्यास हाडे मजबूत होतात.
बद्धकोष्ठतेचा त्रास : या भाजी मध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे पाचकशक्ती सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं.
अतिसार : अतिसारामुळे बेझार असलेल्या रुग्णांना ताज्या चवळीच्या पानांचा रस प्यायला दिल्याने आराम पडतो.
तोंडातील अल्सर : दोन चमचे पानं एक कप पाण्यात दहा मिनिटं उकळून त्यानंतर त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडातील अल्सरचं किंवा घसा सुजणे यावर आराम पडतो.
पाककृती
# साहित्य- चवळीची भाजी, दोन कांदे, तिखट, मीठ, साखर चवीनुसार, दोन मोठे चमचे तेल.
# कृती- भाजी निवडून धुवून चिरून घ्यावी. कांदे बारीक चिरावे. कढईत तेल टाकून फोडणी करावी. कांदा बारीक चिरून फोडणीत घालावा. त्यात कापलेली भाजी टाकावी. वाफ आल्यावर तिखट, मीठ, साखर टाकावे. परत वाफ आणून भाजी सर्व्ह करावी. कोकणात या भाजीत वाफ आल्यावर खोबरं खऊन टाकतात.

संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button