कोल्हापूर येथील १९ व्या साहित्य संमेलनात शब्दकुंज प्रेरणा पुरस्काराने सौ. अंजली मनोज मुनेश्वर कानिंदे सन्मानीत

♦कोल्हापूर येथील १९ व्या साहित्य संमेलनात शब्दकुंज प्रेरणा पुरस्काराने सौ. अंजली मनोज मुनेश्वर कानिंदे सन्मानीत
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/ वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 01/10/2024 : कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या १९ व्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात सौ.अंजली मनोज मुनेश्वर( कानिंदे), नांदेड यांना शब्दकुंज प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सदरचा पुरस्कार डॉ. श्रीकांत पाटील प्रसिद्ध कांदबरीकार यांचे हस्ते आणि संमेलन अध्यक्ष प्रा. पी. एस. पाटील, डॉ रामचंद्र चोथे, दादासाहेब शेख ‘ भाऊसाहेब कांबळे, अशोक मोहिते, शैलजा परमणे, प्रा. संतोष जोईल, सुशिल डवर आणि संमेलन आयोजक कवि सरकार इंगळी यांच्या उपस्थीत २९ सप्टेंबर २४ रोजी देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले. त्यांना पुरस्कार मिळालेने त्यांचे साहित्य क्षेत्रात कौतुक होत आहे.
वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन सल्लागार समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली अर्थात एन. यु. बी. सी. चे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख व महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांनी भ्रमणध्वनी वरून सौ. अंजली मनोज मुनेश्वर – कानिंदे यांचे अभिनंदन केले.