यशवंत क्रांती संघटनेमुळे दोन मेंढपाळांना मिळाली वनविभागाकडुन २२ हजार ३०० रुपये नुकसान भरपाई

यशवंत क्रांती संघटनेमुळे दोन मेंढपाळांना मिळाली वनविभागाकडुन २२ हजार ३०० रुपये नुकसान भरपाई
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
नेर्ले / प्रतिनिधी दिनांक 29/9/ 2024 : बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मेंढरांच्या नुकसान भरपाई पोटी वनविभागाकडुन संजय गणपत सिद व सुदाम तातोबा सिद (रा. नेर्ले ता वाळवा जि. सांगली) यांच्या खात्यावर २२ हजार ३०० रुपये जमा करण्यात आले. यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी नेर्ले ता. वाळवा जि. सांगली या परिसरात गेल्या दोन तीन वर्षांपासून बिबट्याने आपले नैसर्गिक अधिस्थान जंगल ऐवजी उसाच्या शेतात बनवले आहे. सहज मिळणाऱ्या शेळ्या मेंढ्यांच्या शिकारीमुळे जंगलात न राहता कायमस्वरूपी या परिसरातील ऊसाच्या शेतात मुक्काम केला आहे. तीन महिन्यापुर्वी उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने संजय गणपत सिद व सुदाम तातोबा सिद रा. नेरले ता वाळवा जि. सांगली यांच्या मेंढरांच्या कळप रानात चरत असताना हल्ला करून संजय सिद्ध यांची १ मेंढी व सुदाम तातोबा सिद यांच्या १ मेंढीस ठार मारले होते.
मेंढपाळ संजय गणपत सिद यांना ११ हजार रुपये व सुदाम तातोबा सिद रा नेर्ले. ता वाळवा जि. सांगली यांच्या खात्यावर ११ हजार ३०० रुपये अशी दोन मेंढ्यांच्या नुकसान भरपाई पोटी २२ हजार ३०० रुपये जमा करण्यात आले.
नुकसान भरपाई मिळण्यासाठी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, शिराळा वनपरिक्षेत्र अधिकारी पारधी साहेब,वनरक्षक भिवा कोळेकर पशुवैद्यकीय अधिकारी व यशवंत क्रांती संघटनेच्या नेर्ले शाखेच्या पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मेंढपाळ संजय गणपत सिद व सुदाम तातोबा सिद यांनी नुकसान भरपाई मिळाल्यानंतर संघटनेच्या सर्व पदाधिकाऱी, वनविभाग व पशुसंवर्धन अधिकारी यांचे आभार मानले.