ताज्या घडामोडी

“शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी आंदोलना ऐवजी, सरकारशी संवाद वाढवावा लागेल” – विठ्ठल राजे पवार

विधानसभेच्या निवडणुका मार्च 2025 पर्यंत पुढे जाण्याची शक्यता, विठ्ठल राजे पवार.,,

“शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी आंदोलना ऐवजी, सरकारशी संवाद वाढवावा लागेल” – विठ्ठल राजे पवार

* विधानसभेच्या निवडणुका मार्च 2025 पर्यंत पुढे जाण्याची शक्यता, विठ्ठल राजे पवार.,

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/ वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 25सप्टेंबर 2024 : महाराष्ट्र राज्य सह देश पातळीवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला किंवा शेतकऱ्यांच्या मोर्चांना गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्धीच्या माध्यमांपासून जाणीवपूर्व दूर ठेवले गेल्यामुळे शेतकऱ्यांची होणारी आंदोलन त्यामुळे निदर्शनाला येत नाहीत, त्यामुळे सरकारपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आवाज पोहोचूनहीं प्रश्न सुटत नाही त्यामुळे, यापुढे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर आंदोलना ऐवजी सरकारची संवाद वाढवावा लागेल असे मत शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठलराजे पवार यांनी आज संघटनेच्या राष्ट्रीय कार्यालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.

यावेळी संघटनेचे छत्रपती संभाजी नगर अध्यक्ष व प्रदेश उपसचिव काशिनाथ जाधव पाटील, संघटनेचे कामगार आघाडी अध्यक्ष हिरामण बांदल, युवक प्रदेश उपाध्यक्ष रविशंकर पवार, पुणे शहर जिल्हा युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर उपस्थित होते.
विठ्ठल राजे पवार पुढे म्हणाले की आम्ही गेल्या 44 वर्षाच्या म्हणजे साडेचार दशकामध्ये श्रद्धेय युगपुरुष शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अनेक आंदोलन केली त्यामध्ये अनेक मोठे निर्णय शेतकऱ्यांचे हिताचे झाले. मात्र अंमलबजावणी वेळेत होत नाही. मागील काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांची आंदोलन होतात मात्र त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रसार माध्यमांकडून पाहिजे तसा प्रतिसाद
भेटत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारच्या समोर असूनही ते सुटत नाहीत! त्यामुळे आता शेतकऱ्यांची रस्त्यावरील आंदोलने थांबवून, संघटनेने संघटनेचे विधीज्ञ एडवोकेट अजय तलवार यांच्या माध्यमातून न्यायिक लढा उभारला आहे. त्यामुळे आता सरकारशी सु-संवाद वाढवावा लागेल. त्यासाठी संघटना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. आजपर्यंत संघटनेने 10 मोठे निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने घेत सुमारे सव्वा दोन लाख कोटी शेतकऱ्यांना थेट मदत मिळवून दिली तर शेतकऱ्यांच्या विजेचे 39 हजार कोटी रुपये वसुली वरती बंदी आणली आहे. त्यामुळे सरकारला ते वसूल करता येत नाही म्हणून सरकारने कृषी पंपाचे वीज बिल मुक्त केले आहे. यापुढे संघटनेने आता थेट सरकारची संवाद साधत न्यायालयाच्या मार्फत सरकारचे डोके ठिकाणावर आणता येते हे जाणले. संघटनेने केलेल्या न्यायालयीन लढाईमुळे महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पादक शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे बील सरसकट संपूर्ण रोखलेले आहे. तसेच ऊस किमतीवरील लावलेला हजारो कोटी रुपयांचा टॅक्स मुक्त केला आहे, दुधाच्या दरासाठी कायदेशीर लढाई जिंकली आहे. शेतकऱ्यांना थेट शेतमाल विक्रीच्या संदर्भात शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करून पुढे शेतकऱ्यांना दरात व कितव्या दिवशी मूल्य मिळण्यासाठी शासन आदेश कायदा प्रलंबित आहे, हा दाखला देत ते म्हणाले की यापुढे सरकारची मोठ्या प्रमाणात सू-संवाद वाढवून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व शेतकरी सरसकट संपूर्ण कर्जमुक्त करण्यासाठी संघटना प्रयत्नशील राहील.
येत्या विधानसभा निवडणूक होण्याच्या संदर्भात गंभीर स्थिती आहे कदाचित विधानसभेची निवडणूक तीन-चार महिन्यांनी पुढेही जाऊ शकते परंतु जर झालीच तर संघटनेची भूमिका ही निर्णायक राहील, सरकार कोणतेही आले तरी शेतकऱ्यांना फारसा फरक पडणार नाही, मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न शंभर टक्के सोडवण्यासाठी जे सरकार संघटनेशी सुसंवाद साधेल त्यांच्याशी संघटना देखील चर्चेसाठी तयार आहे, संघटना 2024-24 ते 2030 या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये यावेळी राजकीय भूमिका स्पष्टपणे बजावेल असा इशारा देखील विठ्ठल राजे पवार यांनी विद्यमान सरकार, विरोधी पक्षाला देखील दिला आहे. अशी माहिती संघटनेचे राज्य संपर्क व प्रसिद्धी प्रमुख भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितली.

विधानसभेच्या निवडणुका मार्च 2025 पर्यंत पुढे जाण्याची शक्यता, विठ्ठल राजे पवार.,,

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर अखेर होण्याच्या चर्चेला वेग आलेले आहे, पण पुढे बोलताना विठ्ठल राजे पवार म्हणाले की निवडणुका होण्याची शक्यता फारच कमी आहे.? कदाचित महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका मार्चपर्यंत पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही! राष्ट्रपती महाराष्ट्र राज्यातील परिस्थिती चा आढावा घेत आहेत असे दिसते. तो घेऊन महाराष्ट्र सरकारला मुदतवाढ देऊ शकते. हा ऐतिहासिक निर्णय देखील महाराष्ट्राच्या सध्याची परिस्थिती पाहता निर्णय होऊ शकतो किंवा राज्याचे सरकार बरखास्त करून त्या ठिकाणी राष्ट्रपती नियुक्त राज्यपाल शासन येऊ शकते आणि महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुका मार्च २०२५ पर्यंत पुढे जाऊ शकतात, महाराष्ट्र सोबत दिल्लीच्या देखील निवडणुका मार्च 25 मध्ये होतील अशी अत्यंत महत्त्वाची माहिती देखील विठ्ठल राजे पवार यांनी आज दिलेली आहे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button