रानभाजी – चिचूरडा

रानभाजी – चिचूरडा
इतर नावे : चिचारडी, चिचारटी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क / वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 25/9/2024 :
रानभाजी चिचूरडा दिसायला अगदी लहान वांगे, वाटाण्याच्या आकाराचे, पाहताच खुप छान वाटते. याचे आयुर्वेदिक महत्त्व तर आहेच पण भाजीही खूप चविष्ट लागते. चव जरा कडवट पण कारले आणि करटुले पेक्षा खूप वेगळी लागते.
पाककृती
# साहित्य- चिचुरडा, ४-५ मोठे कांदे, ४-५ टोमॅटो, लसूण पेस्ट, भरपुर कोथिंबीर, तेल, जिरे, मोहरी, मीठ, खोबरे बारीक किसलेले, हळद, लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्ध लिंबू, थोडा गुळ.
# कृती – चिचुरडाला स्वच्छ धुवून काटे काढून टाकावे. त्यानंतर त्यांना मोठ्या परातीत घेऊन तांब्याने किंवा वरवंट्याने दाबावे, टचकन फुटून बिया बाहेर येतात. पाण्याने २ वेळा धुवून घ्यावेत. कढईत तेल गरम करून त्यात जिरे मोहरी तडतडू द्यावी. त्यात बारिक चिरलेला कांदा थोडा गुलाबीसर परतवून त्यात चिरलेला टोमॅटो, लसूण पेस्ट टाकून परतून घ्यावे. लाल तिखट, हळद, मीठ घालून अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालून टेचलेला चिचुरडा घालून गॅस मंद करून १०-१५ मिनिटे वाफेवर शिजू द्यावे. अर्ध शिजल्यावर त्यात बारीक किसलेले खोबरे, अर्ध लिंबू पिळून थोडा गुळ घालुन परत एकदा झाकण ठेवावे. पाणी अजिबात घालू नये. ५-६5 मिनिटे ठेवून वरुन बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून गरम गरम भाकरी सोबत खावी. खूप छान लागते.
संदर्भ : फेसबुक
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण