ताज्या घडामोडी

पंगत लागली उठायला ,,,,,, आणि हे चालले जेवायला ,,,,,,,,? आरक्षणाचे तीन तेरा ,,,,,,,,!

पंगत लागली उठायला ,,,,,, आणि हे चालले जेवायला ,,,,,,,,? आरक्षणाचे तीन तेरा ,,,,,,,,!

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 15/10/2023 :
देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी छत्रपती शाहू राजे यांनी कोल्हापूर संस्थानात मागास वर्गीय आणि मराठा यांना ही शिक्षण आणि नौकरी यात आरक्षण ठेवले होते.
याचे कारण अनेक कचेऱ्यात ज्या सगळ्या नौकरी होत्या त्या फक्त ब्राम्हण वर्गाच्या हातात होत्या आणि बहुजन समाज शिक्षणापासून कोसो दूर होता.
महात्मा ज्योतिबा फुले, आणि क्रांती माई सावित्री बाई फुले यांनी सुरू केलेले बहुजनांसाठी चे शिक्षण सर्व दूर पसरले नव्हते किंवा त्याची महती लोकांना कळली नव्हती.
याचे कारण गाव खेड्यातील पारंपारिक जीवन पद्धतीत होते.आणि कारागिरी किंवा शेती साठी शिक्षणाची पारंपारिक पद्धत उपयोगी ठरतं होती. म्हणजे चर्मकाराचा मुलगा कातड्या शी खेळत आणि शेतकऱ्याचा मुलगा औत बैलाशी खेळत. आपोआप ते कौश्यल्य संपादित करत होते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि शैक्षणिक चळवळ झपाट्याने वाढू लागली.
हळू हळू विज्ञान आणि गणिती क्षेत्रात प्रगती झाली. जग आधुनिक झाले. तस तश्या लोकांच्या राहणीमान आणि जीवनात फरक पडत गेला.मी याच्या फार तपशीलात जात नाही. याचे कारण मूळ लेखाचा विषय कांदबरी बनून जाईल.
या काळात पाहिले तर समाजाचे दोन विभाग स्पष्ट होतात.एक आहे रे वर्ग. म्हणजे ज्यांच्या कडे त्या वेळच्या कृषी आधारित अर्थ व्यवस्थेत आर्थिक कणा असलेली शेती ज्यांच्या कडे आहे व त्या व्यवस्थेच्या भोवती फिरणारी उद्योग व्यवस्था ज्यांच्या हातात आहे तो गावकुसातील समाज.
आणि दुसरा नाही रे समाज. जो गावकुसा बाहेर आहे. ज्याचे कडे शेती नाही. शेती पूरक इतर व्यवसाय नाहीत. जसे (घानी तून तेल काढणे )
वतनाच्या थोड्या जमिनी आधारे वरच्या ,खालच्या , मधल्या आळी चे सगळेच 5/50 मालक असलेली कोरडवाहू जमीन
त्याचे ही पलीकडे असलेला ना गाव ना कुस असलेला भटका , माळावर शिकार करून, वेलाच्या टोपल्या विणून , देव डोक्यावर घेऊन , आणि संसार घोड्या, गाढवावर लादून, पाला पालात संसार थटनारा भटका विमुक्त आणि त्याच्या ही पलीकडे जंगलात राहणारा जंगली जुडी बुट्टी , हिरडे , बेहडे, मोहाची फुले , ताड माड याची दारू बनवून पिणारे आणि उंदरे , रान बोके ,पासून थेट लाल मुंग्याची चटणी पक्वान्न म्हणून खाणारे आदिवासी ,,,,
स्वातंत्र्या नंतर किमान याही लोकांचे जीवनमान उंचवावे म्हणून आरक्षण निती चा अवलंब करण्यात आला.
मुळात शेकडो कोटी लोकसंख्या असलेला हा देश. कुणाच्या वाट्याला किती येणार? गावकुसाबाहेर राहणाऱ्या कांहीं लोकांच्या सुधारणा झाल्या. कांहीं घरे निर्माण झाली. पण मोठ्या प्रमाणावर हा वर्ग आज ही अंगमेहनत आणि साफ सफाई चे काम करूनच उपजीविका करत आहे. हे वास्तव आज ही दडवले जाते.
भारतीय समाज हा न्यायप्रिय समाज नाही, तर तो जाती प्रिय आणि जातिसंघटित समाज आहे.
म्हणून तो ब्राम्हण असतो, तो मराठा असतो, तो महार असतो, किंवा पारधी असतो, तो धनगर असतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे हिंदू धर्म हा जात कोंडाळे आहे. बटाटे पोत्यात भरल्या सारखी त्याची स्थिती आहे, प्रत्येक जातीचे अस्तित्व, प्रेरणा, आदर्श, रीती, रीवाज भिन्न ,,,,
म्हणून इथे जात संघटित होते. जातीचा माणूस जात डोक्यावर घेते. ही जात भाषा,जातीय हिताची भाषा बोलता आले की ते पुरेसे ठरते. सगळ्या भौतिक साधन संपत्ती, गाव, तालुके, जिल्हे आणि राज्य ताब्यात असून ही ते दुःखी. आणि ज्यांच्या हातात कोणतीच सत्ता, कारखानदारी, शेती, नाही ते फार सुखी ,,, कारण त्यांना आरक्षण आहे ,,,
शिक्षणात सवलत आहे , आणि बॅकलॉग भरला गेला नाही तरी नौकरीत आरक्षण आहे.
म्हणून ते सुखी ,,,
सगळ्या अर्थकारणाच्या चाव्या स्वतः चे कणवटी ला लाऊन आणि आर्थिक महामंडळे निर्माण करून तुटपूंजी सबसिडी देऊन बँकात हेलपाटे घालून 5/50 हजाराचे कर्ज ही मिळण्यास अनंत अडचणीं चा सामना करावा लागणारा महार , मांग , होलार हा सुखी,,,,?
हे छिनालपन फक्त याच देशात चालू शकते ,
याचे कारण या व्यवस्थेतील लोक
दूट्टपी आहेत. त्यांच्या भावना प्रामाणिक नाहीत.
नाही रे वर्गाने कसलीच भौतिक प्रगती करू नये अशी त्यांची मनोधारणा आहे. त्यांनी फक्त हलकी कामे करावी. शहरात गटारी चे मेन होल उघडुन त्यात त्यांनीच उतरावे. गावाच्या साफ सफाईची कामे करावीत असे त्यांना मनोमन वाटते.
आरक्षणाला विरोध करायचा म्हणून ते गुणवत्ता चे तुणतुणे वाजवतात, आणि तोंडाला येईल असे मोघम बोलतात. म्हणे “90% मार्क घेऊन ही ते नौकरी पासून वंचित आणि 60% घेऊन ही आरक्षण वाले नौकरित.”
यात खरोखर तथ्य आहे काय?
आज कोणत्याही व्यावसायिक शिक्षणा पासून कॉलेज एडमिशन पर्यंत क्लोज ची टक्के वारी पहा म्हणजे समजेल की ते किती टक्क्या ला क्लोज होते ?
परीक्षा घेणारे हे. पेपर ही फोडणारे हेच. आणि भरती करताना मुलाखती घेणारे ही तेच.
नौकर भरती करताना एस सी /एस टी चे जागा असताना ही आणि त्या साठी उमेदवार उपलब्ध असताना ही त्या जागा मोकळ्या ठेऊन उमेदवार मिळाला नाही असे दर्शवून त्या जागी स्व जाती चे उमेदवार तात्पुरते भरती करून नंतर नियमित करणारे हे लोक न्यायी आहेत काय?
ते इतक्या वर थांबले नाहीत. “हे आरक्षण संपवण्याचे पाऊल त्यांनी कधीच उचलले आहे. ते सर्व सार्वजनिक , सरकारी आस्थपनाचे खाजगी करण करून”.
त्यांनी शिक्षणाचे ही खासगी करण केले. आत्ता तर जिल्हा परिषद शाळा ही यातून सुटलेल्या नाहीत. मग
हे कॉन्ट्रॅक्टर नफ्यासाठी शाळा चालवणार, बसेस चालवणार, वीज वितरित करणार, रस्ते बांधणार, धरणाच्या पाण्याचे नियोजन करणार, यात किती दलीत ? किती आदिवासी ? किती भटके विमुक्त कॉन्ट्रॅक्टर आहेत?
या वर्गा कडे असलेली जमीन किती? साखर कारखाने , दूध संघ , शाळा , कॉलेज , अशी आस्थापने किती?
याचा एकदा तरी हिशोब मांडा ,,,,,,,
दोष शोषण कर्त्यांचा नाही ,,,
आमचा आहे.
आम्ही गांडु आहोत ,,,,,, आमचे रक्त उसळत नाही ,,,,, आम्ही बोलतच नाही ,,,,, मुकाटपणे बघत राहतो ,
आमच्या पोटातील अन्न हीच आमची चरबी झाली आहे ,
ते किती जमले? त्यांचे दुःख किती मोठे ,,, त्यांची गरिबी किती मोठी?
शेती उध्वस्त झाली ,,,आत्महत्या केली , कर्ज झाले आत्महत्या केली ,,, आरक्षण मिळाले नाही आत्महत्या केली ,,,,,
आम्ही मरतच नाही ,,,,,,,,
दुष्काळ पडला तरी रान भाज्या शिजवून आम्ही खाणार ,,,,
कोंबडीचे सोलून टाकलेले भोत गरम पाण्यात टाकून त्याची पिसे उपसून मटण म्हणून खाणार ,,,,
शेतातून उंदीर , घोरपडी , ससे आणि नदी नाल्यातील चींगळया मासे, खेकडे पकडून आम्ही खाणार , रेशनचा गहू आणि तांदूळ आणि आनंदाचा शिधा ही आमची दिवाळी ,,,,,,,
अरे जरा लाजा ,,,
थोडी तरी मनाची शरम बाळगा ,,,,
कोठ्यावधी जनतेच्या हातात तुम्ही धतुरा दिला , आणि
तुमचे खरे शोषणकर्ते जे राजकारणात आहेत त्यांची शेती , त्यांची कारखानदारी त्यांच्या शाळा, त्यांच्या गाड्या , त्यांचे बंगले , त्यांचे राजवाडे , एकदा नजरे खाली घाला,,,,,
कोण खाजगीकरण करत आहेत ते बघा ,,,
टोल गोळा कोण करत आहे ते बघा ,,
कुणाच्या खाणी आहेत ते बघा ,,,
आरक्षणाची पंगत त्यांनी केंव्हाच उठवली आहे ,,,,
आत्ता तर केंद्रातील सचिव ही थेट भरती करून घेतले आहेत. यू पी एस सी ला फाट्यावर मारून ,,,,
पोलिस भरती , सैन्य भरती ,शिक्षक, डॉक्टर ही कॉन्ट्रॅक्ट द्वारे भरती ,,,,
आणि तुम्ही चालले जेवायला ,,,,
तुमचे आमचे शत्रू ओळखा ,,, ते समान आहेत
आमचा रोष गरीब मराठ्या वर नाही , त्यांना ही जगण्याचे साधन मिळाले पाहिजे असे आम्हाला ही वाटते. पण एकदा दिशा ठरवून घ्या. कोण शत्रू ,,,,,? कोण मित्र,,,,,? ते ठरवून घेऊयात ,,,
फडणवीस आमचे शत्रू ,,, आणि एकनाथ शिंदे , अजित दादा आमचे ,,,,, भुजबळ आमचे ,,, आठवले आमचे,,,,,
जातीचा माणूस म्हणजे आमचा माणूस या संकल्पनेतून बाहेर पडा तरच व्यवस्था तुम्हाला आम्हाला कळेल.
तुम्ही आम्ही राज्यकर्त्यांचे संस्थानिक बनवले , स्वतः भिकारी झालो. रस्त्यावर आलो. तरी जातीचे म्हणून संस्थानिक प्यारे असतील तर तुमच्या दुखण्यावर कधीच इलाज सापडणार नाही. खरकट्या पत्रावळी वरील लढाया बंद करा. त्यात ना तुमचे भले आहे, ना आमचे.
एकदा प्रशासनातील वाटा ठरवायचाच आहे ना?
मग त्या साठी
जन गणना करा.
सगळ्या समाजाची लोकसंख्या नीच्छित करू ,,,,
त्या नंतर नौकरी असेल किंवा प्रशासन यातील लोकसंख्येच्या प्रमाणात टक्के वारी ठरवून घेऊ ,,,,
गुणवत्तेची काळजी करू नका ,,,
आपापल्या टक्के वारीत गुणवत्तेची स्पर्धा होईल ,,,,
तुम्ही आम्ही काय वेडे आहोत काय?
म्हशीचे शेपूट पिरगळून गुरे राखणारा जातीचा आहे. म्हणून त्याला थोडेच सर्जन बनवून आपले ऑपरेशन कर म्हणणार आहोत ?
हा गुणवत्तेचा बाऊ त्यांनी केला आहे , जे 48%जागा सुंबडीत बसून झुंबडीत खात आहेत , आणि तुमच्यात आमच्यात भांडणे लावून गमत बघत आहेत.
त्यांना ही त्यांच्या लोकसंख्या चे प्रमाणात वाटा मिळेल. त्या पेक्षा एक टक्का ही कमी नाही अन् जादा नाही ,,,,
आपण सारेच या देशाचे मालक आहोत.
आत्ता ही लढाई संस्थानिक आणि पुंड्या चे हातात जाऊ देऊ नका. त्यांना बाजूला सारा. तरच आरक्षणाचे आणि देशाचे , समाजाचे तीन तेरा होण्या पासून वाचतील ,,, हे समजून घ्यावे हीच विनंती,,,,,,,

ऍड. अविनाश टी. काले.
अकलूज, ता.माळशिरस, जिल्हा सोलापूर.
मो.नं. 9960178213

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button