शिंगणापूर-दहिवडी-वडूज-कराड रस्ता व धकटवाडी येथे नवीन पूल बांधकामासंदर्भात खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे निवेदन सादर ; तातडीने कार्यवाहीचे आदेश

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 14/7/2025 :
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर-दहिवडी-वडूज-कराड रस्ता व मौजे धकटवाडी (ता. खटाव) येथे नवीन पूल बांधकामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मंत्रालयात भेट घेतली.
या भेटीत खासदार मोहिते पाटील यांनी या दोन्ही महत्त्वाच्या प्रश्नांबाबत निवेदन सादर केले. सदर निवेदनात या रस्त्याच्या आणि पुलाच्या खराब अवस्थेमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचे तपशील मांडले. या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक आणि रुग्ण प्रवास करीत असून, रस्त्याच्या अपुऱ्या अवस्थेमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी खात्री दिली की नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरात लवकर आवश्यक पावले उचलली जातील.