आपला जिल्हाप्रेरकमहाराष्ट्र

(Aklujichya Chandankar – Vyavhare classne) अकलूजच्या चंदनकर-व्यवहारे क्लासने राखली निकालाची परंपरा

. 🟣ठळक विशेष एम.एच.टी.सी.ई.टी.रसायनशास्त्र विषयात चि.सुयश चंदनकर याने १०० परसेंटाइल गुण मिळवत महाराष्ट्र प्रथम क्रमांक. चि.श्रीराज केचे याने १२ वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये जीवशास्त्र विषयात १०० गुण मिळवत महाराष्ट्र प्रथम क्रमांक मिळवला आहे.

अकलूजच्या चंदनकर-व्यवहारे क्लासने राखली निकालाची परंपरा

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor : Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

(आकाश भाग्यवंत नायकुडे यांज कडून)

मुंबई दिनांक 18/7/2023 :
विद्यार्थींच्या निकालात सातत्याने गुणवत्ता वाढ,मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची अखंड परंपरा जपत गेली १० वर्ष अकलूज,माळशिरस तालुका तसेच सोलापूर जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडविण्यात अकलूज येथील चंदनकर-व्यवहारे क्लासेसचे (Chandankar – Vyavhare Classes of Akluj) मोठे योगदान आहे. क्लास चे संचालक प्रा.अमोल चंदनकर (Pra. Amol Chandankar ), प्रा.समाधान व्यवहारे (Pra. Samadhan Vyavhare)यांच्या जिद्द, चिकाटी, प्रामाणिक प्रयत्न व योग्य मार्गदर्शन या जोरावर आज या क्लासमधील विद्यार्थी उज्वल यश संपादन करून आकाशाला गवसणी घालत आहेत.


या क्लासमधील ७५ विद्यार्थ्यांनी सीइटी परीक्षेमध्ये ९० पसेंटाइल पेक्षा अधिक गुण मिळवून दैदिप्यमान यश मिळवले आहे.तसेच चि.सुयश चंदनकर याने नीट-२०२३ मध्ये ५८५ गुण व १२ वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये ९१ टक्के गुण मिळविले आहेत. तसेच कु.इकरा शेख या विद्यार्थ्यांनीने ९३ टक्के गुण मिळवित माळशिरस तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर कु.सानिका सुर्यवंशी हिने १२ वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये ९१.३३ टक्के गुण मिळविले आहेत. या शिवाय अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
या यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम अन्नपुर्णा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.यावेळी ७५ विद्यार्थांना फेटा,शाल,स्नमानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी क्लासचे संचालक प्रा.अमोल चंदनकर, प्रा.समाधान व्यवहारे यांचेसह विषय शिषक प्रा.जयसिंह पाचपुंड, प्रा. डॉ विजय मगर, प्रा.अनिल माळी, सर्व विद्यार्थ्यी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔵”नीट/सीईटी २०२३ मध्ये उज्वल यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत तर घेतलीच शिवाय त्यांच्या यशात चंदनकर-व्यवहारे क्लासेसच्या तज्ञ प्राध्यापकांचा मोलाचा वाटा आहे.सातत्याने मिळणारे यश हे क्लासच्या नियोजनाचे फलित आहे” : प्रा.अमोल चंदनकर, संचालक

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button