महादेव मळा बाबुळगाव येथे श्रावणमास समाप्ती सोहळा संपन्न

महादेव मळा बाबुळगाव येथे
श्रावणमास समाप्ती सोहळा संपन्न
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 15/9/2023 : सोलापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र महादेव मंदिर, महादेव मळा, बाभळगाव (तालुका माळशिरस) येथे श्रावण मासानिमित्त श्री शिवलीलामृत ग्रंथाचे दुहेरी पारायणाचे आयोजन करण्यात आलेले होते. येथील श्रावणमास समाप्ती सोहळा (काल दिनांक 14) संपन्न झाला.
पहिल्या पंधरवड्यातील ग्रंथ पारायण समाप्ती 31 ऑगस्ट रोजी महाप्रसाद वाटपाने झाली होती. त्यानंतर सुरू केलेल्या ग्रंथ पारायण सोहळ्याची समाप्ती गुरुवार दिनांक 14/9/2023 रोजी शिवालयातील शिवलिंगास पूजा अभिषेक करून आरती नंतर महाप्रसाद वाटपाने झाली.
महादेव मळ्यातील श्री महादेव मंदिराचे सर्वेसर्वा कै. नामदेव कोंडीबा पराडे महाराज यांनी सुरू केलेली धार्मिक कार्यक्रमांची परंपरा त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती शालनदेवी, त्यांचे सुपुत्र दत्तात्रय आणि समाधान यांनी भाविक भक्तांच्या, ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू ठेवली आहे. श्रावणमासानिमित्त महादेव मळ्यातील श्री महादेव मंदिरात दैनंदिन अभिषेक, पूजा, आरती आणि ग्रंथ पारायण वाचन सुरू होते. पारायण वाचक अण्णासाहेब सर्जेराव गोडसे, संजय सुभाष पराडे, शंकर तानाजी गोडसे, दत्तात्रय नामदेव पराडे, समाधान नामदेव पराडे, मनोज बाळासाहेब पराडे, शैलेश अशोक पराडे यांनी सुश्राव्य ग्रंथ वाचन केले. पारायण वाचकांसह दिग्विजय पराडे, शिवंम पराडे, राधा पराडे, श्रावणी पराडे, वैशाखी पराडे, शिवकन्या पराडे, तसेच पराडे परिवारातील सर्व महिलांनी मंदिरातील धार्मिक सोहळा भव्यतेने साजरा होण्याच्या दृष्टीने परिश्रम घेतले.
श्रावण मासानिमित्त शिव मंदिरात आयोजित केलेल्या सर्वच धार्मिक कार्यक्रमांचा आणि महाप्रसादाचा लाभ परिसरातील असंख्य भाविक भक्तांनी घेतला.