१४ ऑगस्ट – अखंड भारत संकल्प दिन
१४ ऑगस्ट – अखंड भारत संकल्प दिन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 14 ऑगस्ट 2024 :
- आज १४ ऑगस्ट.. आज काय विशेष सर्वाना पडलेला एक प्रश्न असावा.. कारण १५ ऑगस्ट १९४७ रोजी हिन्दुस्थान इंग्रजांच्या गुलामगिरितून मुक्त होऊन एक नवीन पहाट घेऊन स्वतंत्र झाला.. म्हणून आपण १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो.. बंधुनो आपल्या स्मरणात स्वातंत्र्य म्हणून फक्त १९४७ पासून पुढील कालखंड एवढाच अर्थ निघेल.. फार फार तर पाकिस्तान आणि बांग्लादेश ही हिन्दुस्थानातून विलग होऊन निर्माण झालेली राष्ट्र आहेत अर्थात फाळणीचा तो मध्यरात्रीचा काळ.. इथपर्यंत आपण विचार करू शकतो.. मग अखंड भारत संकल्प दिन ही संकल्पना केवळ ही दोन राष्ट्र विलग झाली म्हणून का..? तर नाही… हा हिन्दुस्थान म्हणजे केवळ पाकिस्तान आणि बांग्लादेश इथपर्यंत मर्यादित नव्हता… तर मग काय आहे या संकल्प दिनामागील उद्देश..? आणि का दुर्लक्षीत होत आहेत या स्मरनिका..? आणि काय अपेक्षित आहे या अखंड भारत संकल्प दिनातून..? आज याविषयी थोडेसे भाष्य करणार आहे..
आपण या भारतभूमिला देवभूमी मानतो, पवित्रभूमी, पावनभूमी मानतो अशी ही भूमि केवळ जमिनीचा तुकडा नाही तर प्राचीन वैभवशाली इतिहास, आदर्शवादी संस्कृती, सर्वव्यापी विस्तृत झालेले तत्वज्ञान..अशी ही भूमि जगाच्या नकाशावर खूप मोठा भूप्रदेश व्यापून होती.. पण या भूप्रदेशाचे हळू हळू विभाजन होत गेले आणि हा अखंड भारत शेकडो वर्षापासून क्रमाक्रमाने खंडित होत राहिला..
कदाचित बहुतेक जणास हे ही माहित नसेल की, सर्वसाधारणपणे १८५७ ते १९४७ पर्यंत हिन्दुस्थानचे क्षेत्रफळ सुमारे ८३ लाख चौ.कि.मी. इतके विशाल होते.. आज साधारणपणे ते ३३ लाख चौ.कि.मी. इतके आहे.. म्हणजेच केवळ ९० वर्षात सुमारे ५० चौ.कि.मी. भूभाग या हिन्दुस्थान ने गमावला आहे.. याचे पुन्हा स्मरण व्हावे.. ही दैव भूमि.. ही ऋषितुल्य भूमि पुन्हा एकदा अखंडित होऊन एकाच छत्रछायेखाली यावी.. म्हणून १४ ऑगस्ट हा दिवस आपण अखंड भारत संकल्प दिन म्हणून साजरा करतो.. आज त्याचेच औचित्य साधुन मि दोन शब्द तुमच्याशी बोलणार आहे..
मित्रहो, हा फक्त ९० वर्षाचा इतिहास मांडला आहे.. जर इतिहासात डोकावून पाहिले तर ही सुरुवात त्याअगोदर कित्येक वर्षापूर्वीच झाली आहे ही बाब आपल्या निदर्शनास येईल.. पुढे त्याचाही आढावा थोडक्यात घेतला जाईलच.. कारण या विषयावर लिखाण करायचे म्हटले तर अनेक ग्रंथ पुन्हा भरले जातील.. अगदी सम्राट अशोक, सम्राट सिद्धार्थ ( गौतम बुद्ध) , सम्राट चंद्रगुप्त मौर्य किंबहुना त्याही अगोदर दोन चार शतके असतील.. परंतु ज्या ज्या वेळी अखंड भारत संकल्प दिनाविषयी बोलले तर लक्षात येते एकतर समोरचा व्यक्ति हे पहिल्यांदाच ऐकतोय.. त्यातील काही जनांना हा ही प्रश्न पडतो की आता ते जुने उकरुन तरी काय फायदा..?
आज राजसत्ता जाऊन आता कायद्याचे राज्य आलेत.. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नियम आलेत.. नव युग आले.. वसाहतवाद संपून आधुनिकवाद आला आहे.. मग केवळ एका गटाने अखंड भारत संकल्प दिन साजरा केल्याने गेलेली राष्ट्र, भूभाग परत मिळणार आहे का..? तर यावर मी फक्त एकच प्रश्न विचारतो.. आज तरी हिन्दुस्थानच्या अस्तित्वात असलेल्या नकाशाप्रमाणे भूभाग सिमा आहेत का..? तिकडे चीनच्या ड्रैगन ने काही भाग लुबाडला आहे.. पाकिस्तान तर इंच इंच सीमाभागात घुसखोरी करतोय.. प्रदेश गीळंकृत करण्याची त्याची सवय अजूनही गेली नाही. उघडपणे गजवा-ए-हिन्द च्या भाषा बोलल्या जात आहे.. काश्मीर, बंगाल, आसाम ची परिस्थिति आपण ऐकतोय.. अलगावादी, फुटिरवादी गट उदयास येत आहे.. मग मात्र प्रश्न पडतो की.. ही अजुन एखाद्या विभाजनाची नांदी तर नाही ना..?
१९४७ च्या विभाजनाच्या रक्तरंजित खुणा अजुन बुजल्या नाहीत.. किंबहुना ती जखम न भरून येणारीच.. त्यावेळीही हिन्दू समाज अंधारात राहिला.. सर्व धर्म समभाव चे मधुर गीत गात राहिला… गंगा जमुना तहजीब.. हिंदी चीनी भाई भाई.. आणि वैऱ्याने डाव साधला.. अनेक शतके उलटली.. हजारो बलिदान झालीत तरी देखील प्रश्न मात्र मिटला नाही.. किंबहुना जेंव्हा हजारोंच्या संख्येने आजही पलायन होत आहे.. आज अशा घटना पाहिल्या की मानवतावादाचा भ्रम नक्कीच दूर होतो.. मग राष्ट्रीय ऐक्याची गरज भासते..
अखंड भारताचे स्वरूप दर्शवनारा एक खुप सुंदर संस्कृत श्लोक आहे..
हिमालयं समारभ्य यावद इंदु सरोवरमं ।
तं देव निर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते ।।
म्हणजे हिमालयापासून ते हिंदी महासागर पर्यंत पसरलेल्या राष्ट्रास हिन्दुस्थान म्हटले जायचे..हे या श्लोक मधून सिद्ध होते.. म्हणजेच दक्षिणेकडे आर्यन (आजचा इराक) ते आर्यावर्त (इंडोनेशिया) सिंहलद्वीप ( श्रीलंका), मिविष्टप ( तिबेट) म्यानमार, नेपाळ, मालदीव, पाकिस्तान, बांग्लादेश या मधील जो विस्तीर्ण भूभाग आहे तो सर्व हिन्दुस्थान म्हणून ओळखला जायचा.. मागील २५०० वर्षात सुमारे २४ वेळा विभाजणाच्या जखमा या हिन्दुस्थानने भोगल्या आहेत.. त्याचे दूरगामी परिणाम ही भोगले आहे..
ही विभाजने का झालीत याचे एकच कारण शोधायचे ठरले तर मी हेच म्हणेल की, “जब जब हिन्दू घटा ! तब तब देश बटा !! याचीच सार्थ प्रचिती या आजवरच्या विभाजनाच्या माध्यमातून आपल्याला आलेली दिसते.. मग अजूनही आम्ही अंधारात राहायचे की जागृत व्हायचे ते आपणच ठरवायला हवे.. संगठित शक्ती ! सशक्त समाज हेच प्रत्येक समस्यावर प्रभावी औषध ठरणार आहे.. मग पुन्हा ही संघटीत शक्ती आपण कोणाच्या स्वरुपात पाहू शकतो तर अर्थात हिंदुशक्तिचाच विचार करावा लागेल.. सर्वधर्म समभावचे कितीही गोडवे गायले तरी जो समाज या भूमिला आपली भूमी मानतच नाही त्यांच्याकडून अपेक्षा ठेऊन निर्धास्त होऊ शकतो का..? उत्तर आपल्यालाच शोधायला हवे..म्हणून हा अखंड भारत संकल्प दिन..
एकेकाळी सुवर्णभूमि म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भारतभूमिस क्रमाक्रमाने कशी अवकळा येत गेली याचाही बहुतांशी सार या विभाजनात दडला आहे.. असो.. जे गेले ते गेले.. जे अजूनही शेष आहे त्याचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी वैचारिक उत्थान म्हणूनही हा अखंड भारत संकल्प दिन..
अखंड भारत संकल्पाचे हे स्वप्न आजचे नाही.. स्व. नाथूराम गोडसे यांनी तर ऐतिहासिक संकल्प केला होता.. जो पर्यंत अखंड भारताचे स्वरूप उदयास येणार नाही तोपर्यंत माझ्या अस्ती विसर्जित करू नये.. अजूनही त्या अस्ती अखंड भारताच्या प्रतिक्षेत आहेत.. यावरून अखंड भारत ही संकल्पना आजची नाही याचा प्रत्यय येईल.. दुर्देवाने मैकॉलेची गुलाम झालेली शिक्षण पद्धती हा इतिहास कसा प्रकाशित करणार..?
मित्रहो, राष्ट्र म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा नाही.. तर राष्ट्र म्हणजे एक भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा असतो.. या एकाच दुव्यामुळे राष्ट्रातील समाजात राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत राहते.. आणि हिच राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय ऐक्यास पोषक ठरते.. जेंव्हा परकीय आक्रमण सारख्या परिस्थिति उद्भवतात तेंव्हा केवळ जमिनीवर आक्रमण होत नाही तर त्यापाठोपाठ एक विदेशी संस्कृति, रितिरिवाज यांचे ही आक्रमण होते.. असे आक्रमण मुळ संस्कृतिशी साम्य ठेवत नाही.. यातून सामाजिक बंडाळी निर्माण होते.. आणि अशी सामाजिक बंडाळी पुन्हा राष्ट्रीय ऐक्यास मारक ठरते.. हा इतिहास आज आपण अनुभवतोय.. अगदी प्रगत राष्ट्रापासून ते ईशान्यकडील ८ राज्यांपर्यंत.. पाकिस्तान, बांग्लादेश या धर्माधिष्ट राष्ट्राची निर्मिति आणि पुन्हा देशान्तर्गतील धार्मिक कलह हे याचेच प्रारूप आहे..
आमच्याकडे रोज सकाळी उठल्यावर भूमिला वंदन करण्याची प्रथा आहे..
समुद्रवसने देवी पर्वत स्तनमंडले ।
विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शे क्षमस्व मे ।।
याअर्थाने या भूमिस आपण माता मानतो.. देव देवता समान मानतो.. केवळ वंदनीय नाही तर पूज्यनीय ही मानतो.. मग आज ही विभाजित झालेली भारतमाता.. तिचे स्मरण तुम्ही कसे विसरु शकता..? मूर्तिभंज झालेल्या इष्ट देवताचे पूजन आपण निषिद्ध मानतो.. मग आज ति श्रद्धा डळमळीत करुन अखण्ड भारत संकल्पनेचा त्याग कसे करू शकता ? याचे नित्य स्मरण व्हावे म्हणून हा अखंड भारत संकल्प दिवस..
मित्रहो, जर या अखंड हिन्दुस्थान ची व्याप्ती पाहिली तर या अखण्ड भारतामध्ये आजचे अफगाणिस्तान, पाकिस्तान, तिबेट, भूतान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका हे केवळ भारतीय साम्राज्यातच नव्हे तर आजच्या मलेशिया, फिलीपीन्स, थायलंड, दक्षिण व्हिएतनाम, कंबोडिया, इंडोनेशिया इत्यादी राष्ट्र येतात. १८५७ पर्यंत (अफगाणिस्तान, पाकिस्तान, तिबेट, भूतान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका) भारताचाच एक भाग होते, परंतु १८५७ च्या क्रांतीनंतर ब्रिटीश साम्राज्याचा पाया थरथरायला लागला.. त्यांना असे वाटले की एका मोठ्या जमिनीचे शोषणकेंद्र विभाजित करणे आणि अंमलबजावणी करणे, आणि भारताला अनेक लहान भागांत विभागणे हे धोरणच अवलंबणे शक्य नाही. त्यातून फोड़ा आणि झोड़ा या कूट नितीतून (१८७६) मधे अफगाणिस्तानच्या रशिया आणि ब्रिटानिया यांच्यातील गानोडक करारानंतर १८७६ मध्ये अफगाणिस्तान विलग झाला. पुढे भूतान (१९०६), तिबेट (१९१४), श्रीलंका (१९३५), म्यानमार (१९३७) पाकिस्तान आणि बांगलादेश (१९४७) असा एक एक प्रदेश खंडित होत गेला.. एवढेच नव्हे तर १२ व्या शतकापर्यंत हिन्दुस्थान म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, तिबेट, भूतान, बांगलादेश, बर्मा, इंडोनेशिया, कंबोडिया, व्हिएतनाम, मलेशिया, जावा, सुमात्रा, मालदीव आणि भारताच्या सीमारेषातील इतर अनेक छोट्या क्षेत्रांचा समावेश होता. तिथे असणाऱ्या सर्व प्रदेशांचे राजे वेगळे असले तरी सर्व भारतीय क्षेत्रांना हिन्दुस्थानच म्हटले जात असे.. जीवन जगण्याची पद्धति, रीती रिवाज हिन्दूच होत्या..
सांस्कृतिक दृष्टया विचार केला असता हे सर्व प्रदेश कधीकाळी भारत राष्ट्र म्हणून परकीय आक्रमकांना तोंड देत होते. इथल्या संस्कृतीचे जतन व्हावे, संवर्धन व्हावे म्हणून या सर्व प्रदेशांनी भारत राष्ट्र म्हणून संघटितपणे संघर्ष केलेला आहे..
कधीकाळी भारतापासून वेगळे झालेले हे भूप्रदेश आजही संस्कृतीच्या आधारावर भारताशी जोडलेले आहेत. भारतीय संस्कृतीच्या खुणा आजही त्यांची भारताशी नाळ जोडली असल्याची साक्ष देतात. समान संस्कृती, समान रूढी, परंपरा इतिहास या गोष्टी प्रकर्षाने अखंड भारत राष्ट्र म्हणून आजही हा भूप्रदेश अखंड भारताचे अंग असल्याचे पुरावे देतो. गेल्या काही वर्षात झालेल्या उत्खननात आजही ही चिन्हे सापडतात आणि पुन्हा एकदा अखंड भारताच्या विस्ताराचे स्मरण होते..
वर नमूद केलेली आजची राष्ट्र मिळून संपूर्ण क्षेत्राला अखण्ड भारत असे म्हणतात कारण आता हा विभाग खंडित झाला आहे. आणि आज आम्ही ज्याला भारत म्हणतो, खरेतर त्याचे नाव हिंदुस्थान आहे, जिथे भारतीय हिन्दू समाज एकत्र राहत होता.. ज्यात भारताला जाती, भाषा, प्रांत आणि धर्म यांच्या नावाखाली विभाजित केले आहे… इथे एक मुद्दा पुन्हा नमूद करावासा वाटतो की आज हिन्दू म्हटले की थेट धार्मिक, साम्प्रदायिक, अस्मिता याशी अर्थ जोड़ला जातो..
आज हिन्दुस्थान शब्द वापरणे म्हणजे पुन्हा निधर्मीपणाचे आव आणणाऱ्या अधर्मी लोकांच्या नाकाला मिरची झोंबते.. सेक्युलर विचारधारा टाहो फोडू लागते.. संविधान धोक्यात येते.. हे कशासाठी..? तर मुठभर मतांच्या गठ्यासाठी.. मातृभूमिशी बेईमान करणारी ही पांढरी औलाद.. म्हणजेच स्वकीयांना अभिमान सोडाच.. उलट असा विचार करणारे देशद्रोही वाटतात.. एवढी नालायकपणाची परिसीमा.. ही जरी राजकीय समिकरणे असली तरी सामाजिक जागृती म्हणून माझ्या परंपरा, श्रद्धा, इतिहास, सांस्कृतिक वारसा आम्हालाच जपायला हवा..
खरे तर हिन्दू म्हणजे केवळ धर्म नाही.. तर तो एक सामाजिक जीवन जगण्याचा वारसा आहे.. एक संस्कृति आहे.. आज जरी अनेक धर्मीय लोक जगभरातून येवून इथे वास्तव्य करत असली तरी सांस्कृतिक अर्थाने सगळे हिन्दूच आहेत.. काही दशकापूर्वी हाच समाज मोघली अत्याचाराला घाबरून धर्म परिवर्तनसारखे पाऊल उचललेही असेल परंतु त्यांच्या पूर्वजांची बीजे या हिन्दू धर्मातच सापडतात..
‘अतिथि देव भव’ म्हणून या हिंदुभूमिने सर्वाना आपल्या उदरात साठवले.. वाढवले एवढेच नव्हे तर एक स्वाभिमानचे जीने जगण्यास शिकवले.. काही धूर्त लोक उगीच संप्रदाय म्हणून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करुन केवळ सत्तेचे राजकारण करत असतील त्यातून धार्मिक वैमनस्याला खतपानी घालत असतील.. परंतु नक्की आम्ही कोन याचा विचार आजच्या शिक्षित युवा पिढीने करणे आवश्यक आहे..
१५ ऑगस्ट रोजी इंग्रज राजवटीची पूर्णता झाली. पण स्वातंत्र्याच्या आनंदाबरोबरच मातृभूमीच्या फाळणीच्या खोल जखमा सोबत देखील सहन कराव्या लागल्या. १९४७ च्या फाळणीचा पहिला आणि शेवटचा भाग नाही. भारताच्या सीमेचे संकुचन फार पूर्वीपासून सुरु झाले होते. अगदी मोघल राजवटीत ती भयानकता दिसून येते.. सातव्या ते नवव्या शताब्दीपर्यंत लाखो हिंदू अफगाणिस्तान इस्लामच्या पोटात आले. प्रथम पोर्तुगाल मध्ये, हॉलंड मध्ये आणि अखेरीस ब्रिटिशांनी हिन्दुस्थानवर राज्य केले आणि हळूहळू या भूमिची शकले करण्यास सुरवात केली.
पाकिस्तानी दूरचित्रवाणीवर कोणीतरी असे म्हटले आहे की ज्या दिवशी पहिल्या हिंदूने इस्लामचा स्वीकार केला तेथूनच हिन्दुस्थानने विभाजन करण्याचे बियाणे घेतले होते. म्हणजेच हे विभाजन ब्रिटिश कालखंडामधील नक्कीच नाही तर त्याही अगोदर इस्लामी, अरबी आक्रांतांच्या धर्म प्रसाराच्या अभिलाषेने अनेक प्रांतातील समाज धर्मांतरित होत गेला.. आणि मूळ भूमीची नावेच बदलली नाही तर रीतीरिवाज आणि परंपरा ही बदलल्या गेल्या..
मित्रहो, हे मान्य करावे लागेल की अलिकडचे भारत विभाजन हिंदू-मुस्लीम आधारावर केले गेले. पाकिस्तानने स्वतःला एक इस्लामिक राष्ट्र घोषित केले. तिथून सर्व हिंदू, बौद्ध, सिख समाजाला बाहेर पळवण्यात आले. तो रक्तरंजित इतिहास अजूनही मिटला गेला नाही.. धर्माच्या अधारावर झालेली ही फाळणी तशी अन्यायकरक ठरली.. खास करुन हिन्दुस्थानला त्याची मोठी किंमत मोजावी लागली.. कारण आता पाकिस्तान आणि बांग्लादेशमधे हिंदू, बौद्ध, सिख समाजाची लोकसंख्या जवळजवळ शून्य आहे. याउलट हिन्दुस्थानात मात्र इस्लाम जोराने फोफवतोय.. शब्द मात्र वापरला जातोय हिन्दू आतंकवाद.. वा रे ! मानवतावाद्यानो..
भारतीय सैन्यांची मदत घेऊन बांगलादेश स्वतंत्र राष्ट्र बनले.. मुजबुर रहमान यांच्या हयातीत बांगलादेशाला स्वत: एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असे संबोधले गेले परंतु एक दिवस मुजीबुर रहमानचा मृत्यू झाला आणि बांग्लादेश ने स्वतःला इस्लामी राष्ट्र घोषित केले. फाळणीच्या वेळी, तेथे राहणाऱ्या हिंदूंची संख्या ३४ टक्क्यांवरून आज १० टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे आणि भारतविरूद्ध बांगलादेश दहशतवादी कारवायांचा मुख्य केंद्र बनला आहे. कोट्यावधी बांगलादेशी घुसखोर आज भारताच्या सुरक्षेसाठी एक प्रमुख धोका बनला आहे. आज रोहिंग्याच्या स्वरुपात हे दृश्य आपण पहात आहोत.. बंगालमधील राजकीय धोरण आणि हिंदू समाजाची गळचेपी अनुभवत आहोत.. ही कशाची पावले आहेत..? आज यानिमित्ताने याचाही विचार करणे अगत्याचे आहे..
हिन्दुस्थानकडे लष्करी सामर्थ्य आज बलाढ्य आहे परंतु पाकिस्तानावर विजय म्हणजे संयुक्त भारत होऊ शकतो का ? भारताच्या अखंडतेचा पाया संस्कृती आणि इतिहासावर निर्भर आहे.. त्यामुळे केवळ भौगोलिक हेतू परिपूर्ण नाहीच.. एका विस्कळीत भारतामध्ये एक मजबूत, एकीकरणाची, जागृत राष्ट्रीय जीवनाची निर्मिती करून एकत्रित भारताच्या ध्येयाकडे जाणे शक्य आहे. त्यासाठी समाजाने सामाजिक ऐक्याबरोबरच राष्ट्रीय ऐक्यही जोपासने आवश्यक आहे..
मित्रहो, हा अखंड भारत संकल्प दिवस का साजरा करायचा..? तर मि एवढेच म्हणेल की जो समाज इतिहासापासून काही बोध घेत नाही.. तो समाज एक दिवस नष्ट झाल्याशिवाय राहत नाही.. जगाच्या पाठीवर अशी अनेक उदाहरणे आहेत.. एकेकाळी स्वतःला सामर्थ्यवान समजनारे पारसी (पार्शियन) स्वपुरुषार्थ गमावल्याने कसे स्वतःच्या भूमिल परागंद झाले हे इतिहास सांगेन.. आज त्यांच्या अस्तित्वाच्या जीर्ण खुणाही शिल्लक राहिल्या नाहीत..
याउलट जगात एकही ज्यू जीवंत ठेवनार नाही अशी शपथ घेतलेल्या हिटलरने पळून पळून ज्यू लोकांस ठार केले.. सामूहिक कत्तली केल्या.. पण हे ज्यू हरले नाही.. हिटलरच्या पश्च्यात हे जगभरात विखुरलेले ज्यू पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी एका खडकाळ भूमिवर.. जेथे गवताची एक काडीही उगवत नव्हती अशा निर्जन स्थळी आपले इस्राइल हे नवीन राष्ट्र उभारले.. राष्ट्रप्रेमाने भारलेल्या या समाजाने केवळ अस्मिता आणि स्वाभीमानाच्या जोरावर ज्या जगाने त्यांना झिड़कारले आज त्याच जगाला धड़की बसावी असे सामर्थ्यशाली राष्ट्र निर्माण केले.. आज केवळ शस्रसंपन्नच नव्हे तर जगातील एक प्रमुख अन्नधान्य निर्यातदार म्हणून इस्राइलचा नाव लौकिक आहे.. चारी बाजूने शत्रु राष्ट्रानी वेढून सुद्धा कुणाची हिमत होत नाही इस्राइलकडे वाकडा डोळा करुन पहाण्याची.. मी मुद्दाम हे उदाहरण देतोय.. कारण हे कशाच्या जोरावर घडले तर.. प्रबळ इच्छाशक्ति आणि ज्वलंत राष्ट्रअभिमान..
दुर्देवाने आज आमचा राष्ट्रअभिमान कितपत जागृत आहे याचेही आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे.. नक्की आमच्यात कशाची कमतरता आहे..? पराक्रमी वीर योध्यांची ही भूमि.. जगाला अभूतपूर्व ज्ञान देणारी ही भूमि.. विविधतेतुन एकात्मता सांधनारी ही भूमि.. म्हणजेच शस्र संपन्न आणि शास्र संपन्न असणारी ही भूमि आज इतक्या पतित अवस्थेत का जगतेय..? जातिपातिचे, धर्म अधर्माचे राजकारण करुन सत्तेसाठी हपापलेले रक्तपिपासु समाजाची माथी का भड़कवत आहेत..? आणि स्वतःला सुज्ञ समजनारी पीढी त्यास बळी का ठरत आहे..? याचाही विचार या निमित्ताने करणे आवश्यक आहे..
मग आम्ही आमचा आत्मसन्मान जागृत करू शकत नाही का..? लौकिक अर्थाने आपले घर, आपले कुटुंब, आपला परिवार आपला समाज याही सोबत आपले राष्ट्र म्हणून ही काही कर्तव्य आहेत याची जाणीव आपणास केव्हा होणार..? धर्म केवळ अस्मिता नाही तर सांस्कृतिक वारसा जपनारी ती बलस्थाने आहेत याची प्रचिती केव्हा येणार..? जर समाज एकसंध ठेवायचा असेल तर येथील सांस्कृतिक वारसा ही जपला गेला पाहिजे.. विदेशी अनुकरण करावे.. पण जे योग्य असेल ते.. पण मला असे काही वाटत नाही की असे काही आहे जे विदेशीकडून शिकावे..
मातृभूमिसाठी आणि इंच इंच जमिनीसाठी आमचे जवान छातीवर गोळ्या झेलत हसत हसत भारतमातेसाठी प्राण देतात.. कशासाठी..? केवळ जाज्वलंत राष्ट्र अभिमानासाठी.. कारण ही भूमि म्हणजे केवळ जमिनिचा तुकडा नाही तर ही आपली माता आहे.. आणि माझ्या या मातेचे रक्षण करणे माझी जबाबदारी आहे या जानिवेतुन.. सिमेवर आपले जवान त्यांचे कर्तव्य पार पाडतातच.. परंतु देशान्तर्गत आपण आपले कर्तव्य पार पाडतो का..? आज याचाही विचार होणे गरजेचे आहे..
आज देशाची परिस्थिती पाहिली तर धर्माचे अवडबंर समजले जाते.. पण जातीय वादाला, प्रांतवादाला प्रोत्साहन दिले जाते.. राष्ट्रीय ऐक्य ऐवजी संकुचित अस्मिता रुजवली जात आहे.. खोटा इतिहास भासवून हजारो वर्षापूर्वीच्या बलिदानाची यशोगाथा बुजवून टाकन्याच्या प्रयत्न केला जातोय.. आज देशातील आठ राज्ये ईसाई बहुल झाली आहेत आहेत.. तेथे राजरोस हिन्दू संस्कृति आणि अस्मियतेवर मर्यादा लादल्या जात आहेत.. अनेक जिल्हे इस्लामबहुल झाले आहेत तिथे कश्मीर, कैराना सारखी परिस्थिती निर्माण होत आहे.. गेले काही दिवस मुंबईतही पलायनसारख्या घटना घडत आहे.. हे का घडते असा प्रश्न आम्हाला कधीतरी पडायला हवेत.. म्हणून अखंड भारत संकल्प दिन..
वर आपण विशाल हिन्दुस्थानचे स्वरूप पाहिले, मग प्रश्न निर्माण होतो की, इतका विस्तृत अशा प्रदेशात पसरलेला हा हिन्दुस्थान इतका कसा खंडित होत गेला..? अरब मधून आलेले बाबर, मुहम्मद लोदी, मुहम्मद चिश्ती, गजनी, मीर कासिम, पुढे औरंगजेब यांची कोणती लालसा होती..? सिंकदरने जग जिंकन्याची शपथ घेतली त्यासाठी सारे जग पदाक्रांत केले पण धार्मिक नुकसान अथवा सांस्कृतिक नष्टीकरण कोठे केले नाही.. मग अरब मधून आलेले यहूदी आणि मोघल यांची कोणती मंशा होती..? हा सत्तासंघर्ष होता का..? तर मि ठामपणे सांगू इच्छितो की हा सत्तासंघर्ष नव्हता.. सिकंदरची ईर्षा होती, पोर्तुगीज आणि इंग्रजचे व्यापारी धोरण होते पण मोघल मात्र याहून भिन्न होते.. कारण या आक्रमणांचे आमिष हे धर्मप्रचार होते.. म्हणूनच हे धर्मयुद्ध होते.. इंग्रजांनी सत्ताविस्तार साठी फुट पाडून ऐक्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यातून विभाजन सारखी कूटनीति वापरली.. पण मोघलांनी केवळ शस्राच्या जोरावर शास्र नष्ट करण्याचा उद्देश डोळ्यापुढे ठेवला होता.. यातून अनेक प्रदेश विलग होत गेले… या गेल्या शे-दोनशे वर्षाच्या घटना नाहीत तर दीड- दोन हजार वर्षापासूनचा इतिहास आहे.. ५६ इस्लामिक राष्ट्र बनली ती अशीच नव्हे..
मग पुन्हा प्रश्न निर्माण होतो की मग येथे कोणी विरपुरुष नव्हते की काय..? ही आक्रमणे परतावून लावण्याची धमक कुणाच्या मनगटात नव्हती की काय..? होती.. नक्कीच होती.. अयोध्या, राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब अशा अनेक संस्थानात महापराक्रमी योध्ये होते.. फक्त समस्या एवढीच होती कि राष्ट्रीय ऐक्याची.. संस्थाने लढा देत होती.. एकतर केवळ आपला प्रदेश, आपले संस्थान, आपला समाज किंवा आपली सत्ता अबाधित राखण्यासाठी.. पण अखंड हिन्दुस्थान म्हणून एकत्र यावे… मिळून मुकाबला करावा अशी दूरदृष्टी राखता आली नाही.. परिणामी एक एक करत सगळा हिन्दुस्थान परकीय आक्रमणापुढे झुकला गेला..
दुर्देवाने आजही ती परिस्थिति कायम आहे.. आज ही समाज विषण्ण अवस्थेत जगत आहे.. माझेही राष्ट्रविषयी काही कर्तव्य आहे याची जाणीव विसरला आहे.. राजकीय अभिलाशेला बळी पडत आहे.. जातीयवाद, प्रांतवाद या गर्गेत अडकला गेला आहे.. राजकीय पक्ष तर दलाली करण्यासाठी मातृभूमिचाही लीलाव करण्यास धजले असताना सामान्य नागरिक म्हणून समाज ही तितकाच षंड झाला आहे.. ही परिस्थिति बदलायला हवी.. आजच्या युवा पिढीचे ते परम् कर्तव्यच आहे..
ही संस्कृति, या परंपरा, रीतिरिवाज म्हणजे केवळ धोतांड नाही तर समाजातील ऐक्य अबाधित राखण्याची सुत्रे त्यात बांधली गेली आहे.. आज या अखंड भारत संकल्प दिनाच्या निमित्त मि एवढेच सांगू इच्छितो की या भारताला वैभवाच्या परम शिखरावर न्यायचे असेल तर, या हिन्दुस्थानचे गतवैभव पुन्हा प्राप्त करुन घ्यायचे असेल तर अखंड भारताची दिव्य स्वप्ने पाहून ती प्रत्यक्ष साकारण्याची जिद्द मनात ठेवली पाहिजे.. व त्यादिशेने आजच्या युवा पिढीने संक्रमण केले पाहिजे असे मला वाटते..
या प्रसंगी स्व. अटलबिहारी वाजपेयीची सुंदर कविता आठवते
ये आजादी अभी अधूरी है..
दिन दूर नहीं खंडित भारत को पुनः अखंड बनाएँगे
गिलगित से गारो पर्वत तक आजादी पर्व मनाएँगे॥
उस स्वर्ण दिवस के लिए आज से कमर कसें बलिदान करें,
जो पाया उसमें खो न जाएँ, जो खोया उसका ध्यान करें॥
इतिहासाची पुनरावृत्ती होणे हा काळाचा नियम आहे.. ही पुनरावृत्ती टाळायची असेल.. पूर्वजांच्या बलिदानातून टिकवून ठेवलेल्या या भुमीचे संवर्धन करायचे असेल तर अखंड भारत संकल्प आणि स्मरण नित्य व्हायलाच हवे.. कारण या जगाच्या पाठीवर तुमच्यासाठी कोणतीच भूमि शिल्लक नाही.. म्हणूनच आपणच आपल्या भुमीचे रक्षण करण्यासाठी सिद्ध राहिले पाहीजे.. स्वा. सावरकररांनी हाच संदेश दिला आहे की, राष्ट्राच्या सीमा या चरख्याच्या धाग्याने नव्हे तर तलवारीच्या पातीने अखायच्या असतात.. हाच मंत्र घेऊन देश, धर्म आणि संस्कृतीसाठी कटिबद्ध असायला हवे.. आम्ही नाही तरी आमची पुढची पिढी हा संकल्प नक्कीच पूर्णत्वास नेईल त्यासाठी हा राष्ट्रभक्तीचा विचार अखंड भारत संकल्प सतत बुद्धीत, चित्तात, अंतःकरणात रुजला पाहिजे.
काही जण असाही विचार करु शकतात की अखंड भारत खरोखर शक्य आहे का.. तर मी एकच म्हनेल माझ्या साम्राज्याच्या सुर्याचा अस्त होणार नाही.. हेच औरँगजेबला वाटले.. हेच इंग्रज राजवटीला वाटले.. पण आपल्या पुरुषार्थाचे स्मरण येथील भूमिला नक्की होते हा इतिहास आहे.. आज विश्वाची धावाधाव पाहता एक दिवस सारेच विसाव्याची, शांती आणि सहजीवनाची जागा शोधत आहे.. भविष्यात हीच ती भूमि असेल..
भौतिकता से त्रस्त विश्व की, एकमात्र भारत आशा ।
परमानंद शांति की जननी ,पूर्ण करेगी अभिलाषा ।।
आज नाही तर उद्या हे स्वप्न नक्की अवतरलेले असेल..
आजच्या या अखंड भारत संकल्प दिना निमित्त अखंड भारत संकल्प पूर्णत्वास जावो आणि भारत अखंड राष्ट्र म्हणून बलशाली होवो.. एवढी अपेक्षा व्यक्त करतो..
जय हिंद ! जय जय हिन्दुस्थान !!
देशप्रेमी- संपत कौदरे (पुणे-महाराष्ट्र)
८८८८९३१२१९