हे फक्त श्रीपूर परीसरातच घडू शकते सगळे स्वातंत्र्य
हे फक्त श्रीपूर परीसरातच घडू शकते सगळे स्वातंत्र्य
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
श्रीपूर प्रतिनिधी दिनांक 4/8/2023 :
कोणी कुठेही लघुशंका करा
कारण इथे कुठेच सार्वजनिक मुतारीची सोय नाही.
कोणी कुठेही आपली दोन चाकी चार चाकी वहाने रस्त्यात रस्त्याच्या मध्ये उभी करा वहातुकीला अडथळा आणा कारण कोणाचेच लक्ष नाही कोणी विचारत नाही.
रस्त्यावर जिथं जागा उपलब्ध आहे तिथं जागा अडवून कशाही टपरी टाका रहदारीची वहातुकीची कोंडी होऊन अपघात झाले कोणी अपघातात जायबंदी प्रसंगी मरण पावला तरी कोणी लक्ष देत नाही विचारत नाही.
शेतकऱ्यांनी पिकविलेल्या भाजीपाल्याची कवडीमोल भावाने खरेदी करून ती इथल्या ग्राहकांना दामदुप्पट चढ्या भावाने तोच भाजीपाला विकुन त्यांची लुट करा कारण कोणीच कोणाला विचारत नाही.
रस्ते खराब होऊ द्या खड्डे पडु द्या अपघातात हातपाय मोडु द्या नाहीतर मरू दे कारण कोण कोणाला विचारत नाही.
हातभट्टी दारू पिऊन दारुडयांनी भर चौकात रस्त्यावर गल्लीत कितीही गोंधळ घातला अर्वाच्च शिविगाळ करु द्या महिलांच्या सरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येऊ द्या नाहीतर शालेय विद्यार्थ्यांना त्यांचा त्रास होऊ द्या कारण कोणीच कोणाला विचारत नाही.
स्थानिक आमदार खासदार नगरसेवक यांना विकास कामाबद्दल निवेदन नाही दिलं समस्या नाही सांगितल्या तरी काही फरक पडत नाही त्यांचे वाढदिवसाच्या पार्ट्या त्यांचे मोठमोठे फ्लेक्स चौका चौकात लावले पाहिजेत मग त्यांनी पाणी रस्ते स्वच्छता विकासाची कामे नाही केली तरी कोण कोणाला विचारत नाही.
राष्ट्रपुरुषांची जयंती करताना सामाजिक विकासाच्या दृष्टीने विधायक कार्यक्रम नाही केली तरी चालतील पण लाखों रुपये खर्चून कर्णकर्कश आवाज कानठळ्या बसुन वृध्द आजारी रुग्णांना लहान मुलांना प्रचंड त्रास झाला तरी डीजे डालबी लावलेच पाहिजे कारण इथे कोणीच कोणाला विचारत नाही.
गुटखा माणिकचंद खाऊन शरीर खंगले तरी चालेल व्यायाम योगा न करता व्यसनाधीन होऊन व्याधीग्रस्त तरुण मुलांना मेल्यावर खांदा देण्याची वडिलांवर दुर्दैवी वेळ आली तरी चालेल कारण इथे कोणीच कोणाला विचारत नाही कारण इथे सगळ्यांना सगळे स्वातंत्र्य मिळाले आहे अधिकार गाजवायला उच्छाद मांडायला हक्क बजावायला अधिकार आहे मात्र कर्तव्य विसरलं तर कोणी कोणाला विचारत नाही.
कारण इथे स्वातंत्र्य आहे शिस्त नाही आदर नाही वडिलधारी व्यक्तींचा आदर्श मानायला कोणी तयार नाही कारणं इथं कोणीच कोणाला विचारत नाही. कारण इथल्या सारखं मुक्त स्वातंत्र्य अधिकार अन्य कुठ असेल असे वाटत नाही.