रानभाजी – खापरखुटी

रानभाजी – खापरखुटी
शास्त्रीय नाव : Boerthavia diffusa
स्थानिक नाव : खापरफुटी/पुनर्नवा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संग्राहक:आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 14ऑगस्ट 2024 :
खापरखुटी ची भाजी खाली जमिनीवर झुडपासारखी पसरते. तिची ओळख गोलवट पान आणि लालसर देठावरून होते. ही वनस्पती मुतखड्यावर उपयुक्त आहे. या वनस्पतीची मुळासकट बिनतिखट चटणी (५० ग्रॅम) रोज जेवणात असावी. ओली वनस्पती काढून सावलीत वाळवून नंतर वापरता येते.
पाककृती
# साहित्य – खापरखुटी ची भाजी, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसूण, जिरे, तिखट, मीठ, हळद.
# कृती – खापरखुटी ची खुडलेली भाजी धुवून घ्यावी. नंतर एक पातेले घेऊन त्यात पाहिजे तेवढे तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा, मिरची, लसूण, जिरे, तिखट, मीठ, हळद, टमाटर तळुन घ्यावे. नंतर त्यामध्ये भाजी टाकून शिजू द्यावे. नंतर त्यात कोथंबीर टाकावी. अशा प्रकारे खापरखुटी ची भाजी तयार होईल.
संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण