तुझ्यातला माणूस मेला भक्ता…

मणिपूर मधील घटनेने मानवतेचे लचके तोडले…
बेधुंदकार गोविंद पोलाड , यांची कविता……✍️
तुझ्यातला माणूस मेला भक्ता…
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 21/7/2023 :
तू गप्प होतास जेव्हा दिल्लीत किसान मारल्या गेले
पुलवामाच्या प्रकरणावरती जेव्हा प्रश्न विचारल्या गेले
तू दंगलीशिवाय कधीच मित्रा रस्त्यावर आला नाही
तु धर्मासाठी जगला पण कधी देशाचा झाला नाही
महापुरुष बदनाम होत होते अन् तू शांत बसला होता
तू साधा निषेधही करण्यासाठी कुठेच दिसला नव्हता
मणिपूरच्या महिलांची जेव्हा नंगी धिंड काढल्या गेली
एक एक कपडा काढून शरीराची विटंबना केल्या गेली
तु तेव्हाही शांत होतास जेव्हा स्त्री भर चौकात मारल्या गेली
तुझ्या आईलाही खेद झाला असेल की तुझ्यासारखी औलाद पैदा केली
ज्याने राष्ट्रगीत नाकारले अन् तिरंग्याचा अपमान केला
देशापेक्षा तेव्हाही तू त्या विकृताचा सन्मान केला
जेव्हा महागाई, बेरोजगारी, कुणी पिएम फंडाचा हिशोब मागत असतो
तू कलम ३७० सांगतो नाही तर राम मंदिर सांगत असतो
तू कट्टरवादापायी मित्रा इतका लाचार झाला आहे
तू अंधभक्त झाला तुझ्यातला माणूस मेला आहे
बेधुंदकार गोविंद अनिल पोलाड
नागपूर
मो. ८०८०१६६०११