ताज्या घडामोडी
सौ.शांताबाई दादासाहेब राऊत यांचे अकस्मात निधन.

सौ.शांताबाई दादासाहेब राऊत यांचे अकस्मात निधन.
Akluj Vaibhav News Network.
अकलूज दिनांक 19/07/2024 :
गुरूनगर अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील सौ.शांताबाई दादासाहेब राऊत (वय 76 वर्षे) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने अकस्मात निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, 3 मुले, 1 मुलगी, सूना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब मारूती राऊत यांच्या त्या पत्नी तर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष व बाल विकास प्रकल्पमधील राजकुमार राऊत व संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळाचे सचिव संजय राऊत यांच्या त्या मातोश्री होत.
मनमिळावू स्वभावाच्या, धार्मिक वृत्तीच्या कै.सौ.शांताबाई दादासाहेब राऊत यांचे अकस्मात निधनाबद्दल परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.