ताज्या घडामोडी
रखुमाई
रखुमाई
Akluj Vaibhav News Network.
🔰 संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 19/07/2024 :
पांडुरंग पांडुरंग,
सर्वे करिती गजर,
माय रखुमाई वर गं,
आहे कोणाची का नजर!
वारी करिती वारकरी,
घेण्या विठुचे दर्शन,
माय रखुमाई बिचारी,
कुणी जाणा तिचे मन!
भेट घेऊन भक्तांची,
विठु होईल निद्रिस्त,
धावपळ रखुमाईची,
आता तिच्यावरच भिस्त!
कधी वाटे का विठु ला,
द्यावी सवड रखुमाई ला,
डोंगर कामाचा उपसला,
सारे श्रेय विठ्ठलाला !
जसे वाटे प्रत्येकाला,
विठुरायाचा आसरा,
काम किती रखुमाईला,
आवरे जगाचा पसारा!
असे जगाची ही रित,
दिसे पुरुषाचे काम फक्त,
नसे बाई कधी मुक्त,
कसे कष्ट तिचे स्वस्त!
तिची रूपे बघा किती,
किती लावते ती नाती,
तिची जाणा जरा महती,
दिव्या पेक्षा मोठी पणती!
सौ. उज्वला नारखेडे
पुणे,