ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड टेकनॉलॉजी महाविद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा

ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड टेकनॉलॉजी महाविद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharastra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 27/11/2023 :
शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट संचलित
ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड टेकनॉलॉजी महाविद्यालयांमध्ये भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.अनिल लोंढे, प्राचार्य डॉ.सुभाष शिंदे व उपप्राचार्य डॉ.महेश ढेंबरे यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर संविधानाच्या ग्रंथास पुष्प अर्पण करून पुजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. जनार्धन परकाळे यांनी आपल्या मनोगता मध्ये संविधानाचे महत्त्व सांगितले व पुढे ते म्हणाले संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला.
भारताचे संविधान (अन्य नावे: भारताची राज्यघटना, भारताची घटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो. हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत
प्रा. धनश्री हातोळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचे आभार व्यक्त केले. राष्ट्रगीताने महाविद्यालयातील कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमास प्रा.डॉ.पिसाळ, प्रा. क्षीरसागर, प्रा. चौगुले, प्रा.वाघमोडे, प्रा.थोरात, प्रा.शिंदे, प्रा.दोषी, प्रा. कुंभार, ग्रंथपाल कांबळे, इतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.