लिंगायत स्मशानभूमीचा प्रलंबित प्रश्न काँग्रेसच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार – गिरीश शेटे

लिंगायत स्मशानभूमीचा प्रलंबित प्रश्न काँग्रेसच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार – गिरीश शेटे
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 08/10/2025 :
काँग्रेसचे माळशिरस तालुका नूतन अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांचा सत्कार वाणी मळा माळशिरस येथे लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आला. सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी संपन्न झालेल्या या सत्कार सोहळ्याप्रसंगी साप्ताहिक अकलूज वैभव आणि पाक्षिक वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, प्रमोद प्रकाश राजमाने, विलास गुरुलिंग गुजरे, विलास महादेव गुजरे, अरविंद भगवान गुजरे, नाना शिवलिंग गुजरे, महेश विलास गुजरे, गंगाधर शिंदे, प्रमोद चौधरी, भैरोसिंह रजपूत इत्यादींसह लिंगायत समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
सत्कार सोहळ्यानंतर झालेल्या समाजाच्या बैठकीमध्ये विविध विषयांवर सांगोपांग चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आगामी सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होण्याचा निर्धार युवक वर्गाने व्यक्त केला. लिंगायत समाजासाठी माळशिरस मध्ये स्मशानभूमी नाही. लिंगायत स्मशानभूमीचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न काँग्रेसच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार असल्याची ग्वाही या प्रसंगी तालुकाध्यक्ष गिरीश शेटे यांनी दिली.