ताज्या घडामोडी

तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरील हल्ल्याचा शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटने तर्फे जाहीर निषेध,

तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरील हल्ल्याचा शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटने तर्फे जाहीर निषेध,

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰आकाश भाग्यवंत नायकुडे.

मुंबई दिनांक 30/05/2024 :

इंदापूर शहरातील संविधान चौकात तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे .
हल्ला झाला आणि तोही संविधान चौकात.?? इंदापूर तालुक्यामध्ये प्रचंड दहशतवादी आरोपी हे राज्यकर्त्यांनी निर्माण केलेले आहेत!, इंदापूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर हल्ला केलेल्या आरोपींना कठोर शासन कराच पण त्यांच्या पाठीमागे असलेल्या मुख्य सूत्रधाराला देखील बेड्या ठोका आणि त्यांच्यावर देखील, दहशतवादी आरोपी निर्माण करून खुनाचा प्रयत्न करणे असे कठोर कलमाखाली अटक करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.इंदापूर तालुका जिल्हा पुणे येथील तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरील हल्यामागील मुख्य राजकीय सूत्रधाराचा देखील शोध महाराष्ट्र राज्याचे सीआयडी मार्फत तात्काळ घेतला पाहिजे अशी मागणी पवार यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, पोलीस महासंचालक पुणे, विभागीय आयुक्त व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
“प्राणघातक हल्ला तोही संविधान चौकात?? अत्यंत दुर्दैवी घटना, इंदापूर तालुक्याचे नावाला कलंक! तहसीलदार श्रीकांत पाटील यांना तत्काळ उच्च दर्जाचे पोलीस संरक्षण द्यावे. तहसीलदार पाटील यांच्यावर मारेकरी घालणाऱ्यांचा पोलीसांनी तात्काळ शोध लावावा, तहसीलदार यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर आरोपी हे सराईत गुन्हेगार नसून ते मोठ्या राजकीय वरदहस्तांची पिलावळ असल्याचे नाकारता येत नाही! तहसीलदार यांच्यावरील हल्ल्याचा तो नियोजित कट असू शकतो असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की त्यां आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे आणि त्यामागील सुत्रधाराचा देखील तपास पोलिसांनी निःपक्षपाती पणे लावून त्यांच्यावर खून व खुनाचा प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल करून कायमस्वरूपी कारवाई करावी अशी मागणी करीत राजे पवार पुढे म्हणाले की इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील गौण खनिज सहकार क्षेत्रातील शेकडो हजार कोटींचा भ्रष्टाचार बाहेर काढून त्यांच्यावर कठोर शासन करण्याची मागणी केल्या नंतर त्यांनी देखील अशाच प्रकारचा प्राणघातक हल्ला माझ्यावर व माझे कुटूंबावर देखील २०एप्रिल२००८ मध्ये लासुर्णे येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असतांनाच झालेला आहे.लासुर्णे येथील माझे व कुटुंबावरील सदस्यांवर हल्ला करणाऱ्यांपैकी ६० ते ७० शस्त्रधारी हल्लेखोरांची ओळख पटून देखील वालचंदनगर जंक्शन पोलिसांनी राजकीय दबाव वापरून प्रकरण दाबलेले आहे.
इंदापूर तालुक्यात एकतर तहसीलदार आले तर टिकत नाहीत आणि टिकले तर त्यांच्यावर कुरघोड्या करून बदली केली जाते. परंतु श्रीकांत पाटील हे शासनाच्या कर्तव्याची जाणीव ठेवून खमकेपणाने काम करतात.
शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघाचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक , तसेच राष्ट्रीय पिछडा वर्ग अनुसूचित जाती जनजाती एवं अल्पसंख्यांक महासंघ नवी दिल्ली, वेस्टर्न भारताचे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरील झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
इंदापूर तालुक्याला राज्यकर्त्यांनी गुन्हेगारांचा अड्डा बनवलेला आहे, इंदापूर तालुक्यातील दहशतवाद्यांची स्थिती ही बिहार पेक्षा खतरनाक झाल्याचे देखील विठ्ठल राजे पवार यांनी म्हटले आहे. इंदापूर तालुक्याचे तहसीलदार यांच्यावरील प्राण घातक हल्लेखोर आणि त्याच्या टोळीच्या सूत्रदाराचा शोध सीआयडी पोलिसांनी लावावा अशी मागणी केली आहे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.