एक दिवस पुण्यश्लोक अहिल्यादेवी मातेसाठी

एक दिवस पुण्यश्लोक अहिल्यादेवी मातेसाठी
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 28/05/2024 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भारतातील सर्वात मोठा 299 वा जन्मोत्सव शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता चौंडी येथे साजरा होतोय.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे सह अनेक मंत्री चौंडी येथे येत आहेत .आपणास विनंती आहे की 31 मे रोजी आपण चौंडी येथे उपस्थित राहून एकीचे दर्शन दाखवाव. 1 जून ते 15 जून या कालावधीमध्ये आपापल्या भागात जयंती उत्सव कार्यक्रम आयोजित करावेत. तसेच दर्शनासाठी व जयंती महोत्सवात सहभागी होण्यासाठी चौंडी येथे 31 मे रोजी सकाळी 10.00 वाजता यावे.
कार्यक्रम स्थळी वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन च्या वतीने धनगर समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना देण्यात येणार आहे तरी आपल्या समाज बांधवां पैकी ज्या कोणास काही सुचवायचे असेल तर त्यांनी सुचवावे असे आवाहन वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव आटोळे मोबाईल नंबर 9923584072 आणि WDSO अर्थात वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन च्या सल्लागार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे मोबाईल नंबर 98 60 95 97 64 यांनी मीडिया माध्यमाद्वारे केले आहे. अशी माहिती राष्ट्रीय समन्वयक सखाराम खोत आणि राष्ट्रीय सरचिटणीस अजय गाढवे यांनी सांगितली.