
पासबुकात “रक्कम” आणि श्वास बुकात “सत्कर्म”
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
मुंबई दिनांक 20/05/2024 :
स्मशानभूमीची सुरक्षा तपासणी किती कडक आणि मजबूत असते, हे तर विचारूच नका साहेब! अहो, पैसा तर फार दूरची गोष्ट आहे, इथे श्वासही सोबत घेऊन जाऊ देत नाही! तुम्ही कीतीही मोठे किंवा तुमची थेट वर पर्यंत ओळख असली तरी!
काळाचा कावळा आयुष्याच्या माठावर बसतो अन् रात्रंदिवस वय पीतो!
‘माणूस समजतो: मी जगतोय!!
माणूस खाली बसून पैसे आणि संपत्ती मोजतो: काल किती होते आणि आज ते किती वाढले आहेत आणि वरती तो हसणारा माणसाचे श्वास मोजतो : घकाल किती होते आणि आज किती उरले आहेत !!
तर चला, “उरलेले” आयुष्य “अवशेष” बनण्यापूर्वी त्याला “विशेष” बनवूया!
“पासबुक” आणि “श्वास बुक” , दोन्ही रिकामे असल्यास भरावे लागतात. पासबुकात “रक्कम” आणि श्वास बुकात “सत्कर्म”
म्हणून
`एकमेकांचा आदर करा. चुका विसरा. अहंकार टाळा.’
“आयुष्य आहे तो पर्यंत हसत हसत घालवा. रडून वा भांडून तरी काय साध्य होणार?”
🔹जीवनाचे सार
जीवन जगताना खरंतर कंडक्टरसारखं राहता आलं पाहिजे.
रोज वेगवेगळे प्रवासी सोबत आहेत,पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाही.
रोजचा प्रवास आहे पण प्रत्यक्षात आपल्याला कुठही जायचं नाही,
ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही.
बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत.
ड्यूटी संपल्यावर सारं काही सुपूर्त केलं की झालं.
मित्रांनो जीवन सुंदर आहेच,फक्त आहे त्याचा मनमुराद आनंद घ्या काही घेऊन गेला नाहीत तरी सगळ्यांच्या मनात राहून जा हेच जीवन आहे.
“अज्ञात लेखकास समर्पित”-
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे. मुंबई