ताज्या घडामोडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घातल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान कसा होऊ शकतो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घातल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान कसा होऊ शकतो

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात आले असता त्यांना जिरेटोप डोक्यावर ठेवून त्यांचे स्वागत केले आहे यावर महाराष्ट्रात विरोधकांनी एकच टिकेची झोड उठवली आहे नरेंद्र मोदी यांना पटेलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप घातल्याने महाराष्ट्राचा अवमान झाला मोदींची तुलना महाराजांशी केली त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे वास्तविक पाहता प्रतिकात्मक एखादी बाब अभिनय व परंपरा जोपासली तर त्यात वावगे काय
एखाद्या नाटकात चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भुमिका करणार्या अभिनेत्याने भुमिका करताना महाराजां सारखा पोशाख अभिनय संवाद म्हटले तर अवमान होत नाही मग केवळ जिरेटोप डोक्यावर ठेवून सन्मान केला तर महाराष्ट्राचा महाराजांचा अवमान कसा होऊ शकतो मागे एकदा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या महाराष्ट्रात आल्या होत्या तेव्हा कांग्रेस पक्षाने त्यांचे स्वागत करतांना महाराष्ट्राची ओळख असणारी पारंपरिक नऊवारी साडी त्यांना नेसवली होती आणि तो फोटो महाराष्ट्रातील सर्रास दैनिकात पहिल्या पानावर प्रसिध्द केला होता दुसरी बाजू अशी की त्या निमित्ताने जिरेटोप घातल्याने महाराजांच्या आठवणी पराक्रम व इतिहासातील आठवणींना उजाळा मिळाला आहे हल्ली कोण कशाचे राजकारण करेल व कुठं काय बोलेल व काय मांडेल हे सांगता येत नाही राजकारण्यांनी बाजार मांडला आहे एवढे मात्र निश्चित

बी.टी. शिवशरण, पत्रकार
श्रीपर

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button