लांडगा सदृश्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात १७ बकरी ठार

लांडगा सदृश्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात १७ बकरी ठार
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 14/05/2024 :
लांडगासुदृश्य वन्य प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात हुपरी येथील बापू मुधाळे व साताप्पा मुधाळे यांच्या १७ बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी संध्याकाळी ७ ते ८ वाजण्याच्या दरम्यान घडली. या हल्ल्यात मेंढपाळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की बापू कृष्णा मुधाळे, साताप्पा बापू मुधाळे, सिद्धू मुधाळे, राहणार हुपरी ता. हातकणंगले या सर्व मेंढपाळांच्या सुमारे ४०० मेंढ्यांचा कळप हुपरी येथील शरद गाठ यांच्या व तळदगे हुपरी रोड लगतच्या गाठ मळा (तपोवन) येथील गट नंबर १४४६ या शेतात खतासाठी दहा-बारा दिवसापासून बसायला आहे.
शनिवार दि.११ मे २०२४ रोजी संध्याकाळी साडे सातच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झालेने मेंढपाळ बाजूला असणाऱ्या शेडमध्ये थांबले. या पावसातच लांडगासुदृश्य वन्यप्राण्यांच्या कळपाने मेंढरांच्या तळावर हल्ला चढवला. या हल्ल्यात बापू कृष्णा मुधाळे यांच्या १२ व साताप्पा बापू मुधाले यांची ५ बकरी मृत्युमुखी पडली. यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे व कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस राम कोळेकर यांनी घटनेबाबत संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना माहिती दिली.
विजय कांबळे वनपाल हातकणंगले, मंगेश वंजारे वनरक्षक तमदलगे, अरुण खामकर वनरक्षक, लहू भंडारे वनसेवक, यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तालुका पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी डॉक्टर माळी व त्यांच्या सहकार्यानी मृत बकऱ्याचे शवविच्छेदन केले. यावेळी बोलताना संजय वाघमोडे म्हणाले की शेळ्या मेंढ्यांच्या रूपाने सहज मिळणाऱ्या शिकारी मुळे वन्य प्राण्यांनी जंगलाऐवजी शहर व गावाशेजारी उसात वस्ती स्थान निर्माण केले आहे. तसेच वन्यप्राण्यांची संख्या वाढली असल्याने शेतकरी पाळीव प्राणी मालक मेंढपाळ यांनी सावधानता बाळगायला हवी.
याप्रसंगी पांडुरंग खेमलापुरे, बाळासाहेब सिद्धू मुधाळे, साताप्पा बाबुराव मुधाळे, मायाप्पा सिद्धू मुधाळे, दत्ता रामा भानसे, बापू कृष्णा मुधाळे, इत्यादी व हुपरी गावातील ग्रामस्थ व मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घडलेल्या घटनेमुळे हुपरी मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे