अक्षय तृतीया
अक्षय तृतीया
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 10/05/2024 :
वैशाख मासातील प्रथम प्रासादिक व्रत व उत्सव आहे अक्षय तृतीया.कृत युगाचा प्रारंभ याच युग तिथीला झाला होता. त्यामुळे या तिथीच्या प्रारंभाच्या प्रवाहअनुरूप त्या युगामध्ये व्यक्तीला आयुष्य जास्त प्रमाणात होते. सेवा उपासना जास्त व्हायच्या. पुण्यदायक आचार विचार व्हायचे. आणि एकमेकांमध्ये एक वेगळीच बांधिलकी आपल्याला दिसायची. या कृत युगासारखीच फलश्रुती या युगातही आपल्याला मिळवता यावी या उद्देशाने एक दिवस का होईना आपल्याला या दिवशी मिळत असते, ती अक्षय तृतीयेच्या दिवशी. विशेष म्हणजे चैत्र गुरु गौरीची सुरुवात आपण चैत्र तृतीयेच्या दिवशी करत असतो आणि या व्रताची सांगता सौभाग्यदोन व्रत वैशाखात तृतीयेला म्हणजेच अक्षय तृतीयेला होत असते. झोपाळ्यावर गौरीहराचे पूजन केल्यानंतर एका सुवासिनीला बोलावून हळदीकुंकू देऊन तिला कैरीचे पन्हे,आंब्याचा रस, त्यासोबत यथा शक्ती सौभाग्य अलंकार देऊन सन्मान करायचा असतो. म्हणून या तिथीला चुडा दानाचे जास्त महत्व आहे.
तसेच याच दिवशी बदरीकाश्रमाचे द्वार उघडले जातात. कारण भगवान विष्णूच्या 24 अवतारांपैकी तीन महत्त्वाच्या अवतार याच दिवशी झाले होते.
*पहिला अवतार – भगवान नर आणि नारायण जी बद्रिकाश्रमाची प्रमुख देवता आहे.
*दुसरा अवतार- भगवान हयग्रीव , ज्यांनी हयग्रीव असूरांचा वध केला, आणि त्यांच्या संवादातून ललिता सहस्रनामा सारखे प्रासादिक स्तोत्र मानव कल्याणासाठी जगाबाहेर आले.
*तिसरा अवतार- भगवान परशुराम यांनी 21 वेळा क्षत्रिय विहीने पृथ्वी प्रदक्षिणा केली आणि समवेत पृथ्वीला खरं दान कसे करतात हे सुद्धा जगासमोर आणून दिले. कोकणासारखा प्रांत या परशुरामाच्या आशीर्वादाने प्रगतीस व प्रकट्याला आले. या तीन महत्त्वाच्या भगवान विष्णूच्या अवतारांचे प्रकट्याचे महत्त्वाचे पर्व अक्षय तृतीयेच्या दिवशी झाले.
ज्यावेळेस पांडव वनवासात होते, त्यावेळेस भगवान कृष्णाची व त्यांची भेट एका मंदिरात झाली. त्यावेळेस त्यांनी विचारले की परमेश्वरा आम्ही तर खूप सारे दानधर्म केले. खूप पूजा उपासना व होम हवन केले मग त्यांचे पुण्य कुठे गेले की ज्यामुळे हा वनवास आमच्या पदरी आला. भगवान विष्णू म्हणाले, तुम्ही जे काही पुण्य कर्म केले ते पुण्य कर्म तुमच्या सुख किंवा दुःख त्यांच्या फल प्राप्तीमध्येच उपयोगी आले. मग पांडवांनी विचारले की असे काही व्रत नाही का? किंवा सण नाही का? किंवा दिवस नाही का? की ज्या दिवशी आम्ही काही पुण्य केले तर त्यांचे फळ अक्षय राहील.
त्यावेळेस भगवान विष्णू म्हणाले अक्षय तृतीया हा दिवस असा आहे की त्या दिवशी तिळाच्या दाणा एवढे दान जनमानसाच्या कल्याणासाठी जरी केले तर त्या दानाचे श्रेय अक्षय टिकते म्हणजेच आपण त्याचा कितीही उपयोग केला तरी ते दान लयाला जात नाही म्हणून या दिवशी देव कर्म जास्त करायचे म्हणजेच देवांचे पूजन, अभिषेक, होमवन या दिवशी जास्त करावे. तसेच वैशाख महिन्यात उष्णतेचा उद्रेक असतो. त्यावेळेस जर जीवसृष्टीला अन्न पाणी देऊ शकलो तर त्या जीवाच्या आशीर्वादाने विपुल अशा अखंड सौख्याची प्राप्ती आपल्याला होते म्हणून याच दिवशी या तिथीला पाणपोया उभारल्या जातात . परंतु प्रत्येकाला हे शक्य नसते म्हणून घरच्या घरी उदक कुंभाचे पूजन व दान , शिद्या सह करावे. अशी आपली पूर्वाचार्यांची परंपरा होती.
समवेत पंखा दान करायचा विधी होता. जो अनवाणी असेल त्याला जोडदान केले जायचे. ज्याच्या डोक्यावर छत्र नसेल त्याला छत्री दान दिली जायची. असे अनेक उपाय आपल्या पूर्वाचार्यांनी सांगितले होते.
*अक्षय तृतीयेच्या दिवशी केले जाणारा महत्त्वाचे विधी
सकाळी लवकर उठल्यानंतर आई-वडिलांचे पूजन त्यांचे स्मरण पती-पत्नी एकमेकांबद्दल आदर भावना ठेवणे. तसेच आपल्या देवघरातील देवांना योग्य ते स्तोत्र मंत्र म्हणून अभिषेक करणे. आराध्य देवतांच्या नावाने हवन करणे. गाईच्या गवरीने अग्नी प्रज्वलित करून तिळाच्या तेलाने किंवा तुपाने श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र , नवार्णव मंत्र, महामृत्युंजय मंत्र किंवा ज्या काही आपल्या इष्टदेवता असतील त्यांच्या स्तोत्रमंत्रांनी हवन करणे.