विद्येची देवता सावित्रीमाई व क्रांतीबा ज्योतीबा फुले यांना भारतरत्न न देण्याची प्रवृत्ती केंद्र सरकारची

विद्येची देवता सावित्रीमाई व क्रांतीबा ज्योतीबा फुले यांना भारतरत्न न देण्याची प्रवृत्ती केंद्र सरकारची
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
अकलूज दिनांक 09/05/2024
सामाजिक क्रांतीचे प्रणेते व विद्येची देवता सावित्रीमाई फुले या थोर महात्म्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून संपूर्ण देशभरात पुरोगामी विचारवंत व तमाम जनतेची मागणी असतांनाही केंद्र सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची आपली कोती विचारसरणी व दुष्ट प्रवृत्ती असल्याने सदर पुरस्कार देण्यात आपला जातीवादी धर्मवादी चेहरा दाखवून दिला आहे. ज्या प्रचलित समाज व्यवस्थेने फुले दांपत्याला आयुष्भर छळलं त्रास दिला त्यांच्या महान कार्याची दखल जगाने घेतली पण भारतात धार्मिक व मनुवादी व्यवस्था जोपासणारी मंडळी सत्तेत बसली आहेत. त्यामुळे फुले दांपत्याला मरणानंतरही त्यांचं महत्व श्रेष्ठत्व महान कार्य त्यांना मान्य नाही. ही बहुजनांच्या अस्मितेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. फुले दांपत्याला भारतरत्न दिला तरच त्यांचे कार्य उजळून निघेल किंवा महती वाढेल अशातला भाग नाही. परंतु जे क्रिकेट खेळणारे मानधन घेऊन खेळतात त्यांना तसेच मानधन घेऊन चित्रपट नाटके करतात त्यांना भारतरत्न दिला जातो ज्यांनी राजकारण समाजकारण करताना अनेक भानगडी कुलंगडी केल्या त्यांनाही भारतरत्न आणि ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला अंधश्रद्धेचा बुरखा फाडला तसेच सामाजिक सांस्कृतिक वैचारिक परिवर्तनवादी विचारांची पेरणी केली महाराष्ट्रात सामाजिक एकतेची क्रांतीची बीजे रोवली. कर्मकांड थोतांड व्यवस्थेला सुरुंग लावला. त्या महान क्रांतीकारक तसेच शिक्षणाची विद्येची देवता सावित्रीमाई यांना कर्मदरिद्रीपणा जोपासणारे केंद्र सरकार भारतरत्न पुरस्कार देण्याचा अद्याप विचार करत नाही. तमाम बहुजन व पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या शोषीत पिडित वंचित बहुजन घटकांनी जो पर्यंत फुले दांपत्याला भारतरत्न दिला जात नाही तोपर्यंत केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. दगडातील कृत्रिम देवाला साष्टांग दंडवत घालून गोमूत्र प्राशन करणारे माणसाला माणूस म्हणून जगण्याचे विचार व अधिकार देणाऱ्या क्रांतीबा ज्योतीराव व विद्येची देवता सावित्रीमाई यांना न ओळखू शकलेल्या नीच सनातनी विचारांची बांधिलकी जपणारे सरकारचा सर्वत्र निषेध व्यक्त केला पाहिजे.
बी.टी.शिवशरण
ज्येष्ठ पत्रकार