ऑनलाईन जीवघेणा खेळ पैशांचा..!!

ऑनलाईन जीवघेणा खेळ पैशांचा..!!
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharastra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 01/12/2023 :
ऑनलाइन रमी खेळा आणि पैसे जिंका !!! ऑनलाइन गेम खेळा आणि लवकरात लवकर श्रीमंत व्हा!!! ऑनलाइन गेम सोप्या पद्धतीने पैसे कमवण्याचे एक साधन!!!ऑनलाइन गेम खेळणे कायदेशीर आहे!!!ऑनलाइन गेम खेळून लाखो लोक पैसे जिंकत आहेत तुम्ही पण या आणि गेम खेळा !!!जंगली रमी पे आओ ना महाराज..!!! अशा अनेक जाहिराती आपण टि.व्हीवर पाहत आहोत,पेपर मध्ये वाचत आहोत.मोबाईल मध्ये तर दर पाच मिनिटांनी यांची जाहिरात येते. आणि ह्या जाहिराती मराठी कलाकार हिंदी सिनेसृष्टीचे कलाकार तसेच भारतरत्न पुरस्कार विजेता देव माणूस सुद्धा करताना आपण पहात आहोत.हे दुर्दैवी आहे.
अशी जाहिरात करण्यासाठी या कलाकारांना मोठे मानधन मिळते.ते पैसे कमवायचे म्हणून या जाहिराती करत आहेत. यामुळे आज घडीला भारतामध्ये लाखो करोडो जन ऑनलाइन पैशांचा खेळ खेळत आहे.आणि स्वतः आपले उज्वल भविष्य बिघडून घेत आहेत.
पैशांचा खेळ हा एक प्रकारचा मटका ,सट्टा आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होणारच. हे माहिती असूनसुद्धा लोक या खेळाकडे दुर्लक्ष करत नाहीत.हे फार कठीण आहे. आज संपूर्ण भारत देशामधील नवतरुणांना या ऑनलाइन गेमिंग च्या विळख्यामध्ये अडकवले जात आहे. आज संपूर्ण भारतामध्ये ऑनलाइन खेळांचे साम्राज्य वाढले आहे जंगली रमी ,रमी सर्कल तीन पत्ती ,ड्रीम ११ अशा अनेक खेळांची लोकप्रियता केवळ स्मार्टफोनमुळे वाढली आहे सध्या मार्केटमध्ये स्मार्टफोन परवडतील अशा किमतीमध्ये उपलब्ध आहेत.तसेच ऑनलाईन गेम ॲप फ्री डाउनलोड करता येते. तसेच मोबाईल कंपन्या सुद्धा इंटरनेट अतिशय स्वस्त दरामध्ये ग्राहकांना देत आहेत. त्यामुळे सर्वच स्तरांतून लोक हा पैशांचा खेळ जास्त खेळत आहे. आणि स्वतःचं, स्वतःच्या परिवाराचं तसेच समाजाचेही आयुष्य बरबाद करून घेत आहे. हे खेळ खेळावेत म्हणून या वेबसाईट वरती विविध प्रतियोगिता, पुरस्कार ठेवली जातात बोनस रक्कम दिली जाते. या अशा खोट्या प्रलोभनाला बळी पडून त्याच्या जाळ्यात नवतरुण ,प्रौढ,मुले ,मुली ,महिला सुद्धा गुरफटल्या जात आहेत.मद्रास मध्ये एका महिलेने साडेसात लाख रुपये तसेच तीन लाख रुपये किंमतीचे सोने या गेममध्ये हरले आणि हे नुकसान तिला सहन झाले नाही म्हणून तिने आत्महत्या केली. दुसरे उदाहरण मध्य प्रदेशातील एका मुलाने नऊ लाख रुपये या गेममध्ये गमावले नंतर या खेळाचे व्यसन लागल्यामुळे तो गुन्हेगारीकडे वळाला. ही दोनच उदाहरणे नसून संपूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये असे अनेक उदाहरणे घडत आहेत जे की आपल्यापर्यंत कधी पोहोचतात आणि पोहोचत सुद्धा नाही. फारच क्लेशदायक बाब आहे.
ऑनलाईन पैशांचा खेळ हा एक प्रकारचा मटका सट्टा आहे. यामुळे आर्थिक नुकसान होणार हे नक्कीच. जिंकण्याची संधी मात्र फारच कमी आहेत. खोट्या प्रलोभनास बळी पडून लोक या खेळाकडे आकर्षित होतात .सुरुवातीला एक ते दोन वेळेस पैसे जिंकतात ही जेव्हा त्यांच्याकडे चांगली पत्ते कार्ड उपलब्ध आहेत असे भासवले जाते. त्यामुळे त्यांना असे वाटते की आपण जिंकू आणि मग ते स्वतः जवळील रक्कम बोलीमध्ये लावतात . समोरचा त्याच्यापेक्षा जास्त बोली लावतो आणि हे स्वतः जवळील रक्कम संपली की बाद होतात .समोरच्याचे पत्ते कार्ड न पाहता त्या ठिकाणी चांगले पत्ते हातात घेऊन सुद्धा ते हरतात. ऑनलाइन पैशांच्या खेळांचे व्यसन लागलेले असते.स्वतःजवळ पैसे नसेल तर हे लोक मित्र, सहकारी, नातेवाईक यांच्याकडून पैसे उसने घेऊन हा खेळ खेळतात .कर्जबाजारी होतात .व्याजाने कर्ज काढल्यामुळे कर्जाची परतफेड ते करू शकत नाहीत .त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती ढासाळते, गृहकलह होतो, समाजामध्ये आपली प्रतिष्ठा जाईल या कारणामुळे ही लोक एकलकोंडी होतात.आपल्या प्रियजनांना पासून दूर जातात.आपण हरलो ही जीवनात काही करू शकलो नाही.हे शल्य मनास सतत बोचते.त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये जातात आणि आत्महत्या ही करू शकतात. असा जीव घेण्या ऑनलाईन पैशांचा खेळ मात्र अजुनही भारतात, महाराष्ट्रात सुरूच आहे. परंतु या खेळावर तेलंगणा, मेघालय ,आसाम ,सिक्कीम नागालँड ,केरळ अशा राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. आपल्याही राज्यामध्ये बंदी आली पाहिजे.या खेळाच्या विरोधात सामाजिक जागृती निर्माण झालीच पाहिजे यासाठी हा लेख लिहिण्याचे प्रयोजन मी केले आहे. कारण ऑनलाइन रमी पैशांचा खेळाचे मालिक सर्वसामान्य माणसांच्या खिशातले पैसे काढून घेऊन मलामाल होत आहेत आणि दुसरीकडे मात्र भारताचे भविष्य असणारे नवतरुण कंगाल होत आहे.
असा हा पैशांचा खेळ.. जीवघेणा आहे!!!!
लेखिका
सौ.अंजली मनोज मुनेश्वर नांदेड
मो.नं.९६३७११६५५३