सद्गुरु श्री. श्री. सा. का. स्थळावर प्रा. डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांचे “जलतारा प्रबोधन कार्यशाळा व प्रात्यक्षिक” संपन्न

सद्गुरु श्री. श्री. सा. का. स्थळावर प्रा. डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांचे “जलतारा प्रबोधन कार्यशाळा व प्रात्यक्षिक” संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 24/5/2025 :
सद्गुरु श्री श्री साखर कारखाना लि. श्री श्रीनगर राजेवाडी या कारखाना स्थळावरती “ज्ञानमंदीर” श्री. श्री. नगर (राजेवाडी) या ठिकाणी प्रा. डॉ. पुरुषोत्तम वायाळ (जलतारा जनक व राज्यस्तरीय सदस्य आदर्श गाव समिती महाराष्ट्र शासन, जलतारा प्रकल्प मनेरगा महाराष्ट्र शासन, पंतप्रधान सिंचन योजना महाराष्ट्र शासन, व प्रशिक्षक आणि समन्वयक दि आर्ट ऑफ लिविंग) यांचे “जलतारा प्रबोधन कार्यशाळा व प्रात्यक्षिक” संपन्न झाले.
गुरुवार दिनांक 22 रोजी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे चेअरमन एन. शेषगिरी राव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, संचालिका सौ. उषाताई मारकड व सर्व संचालक, राजेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच प्रशांत शिरकांडे, खळवे गावचे सरपंच आणि असंख्य शेतकरी ऊस उत्पादक सभासद उपस्थितीत होते. प्रा. डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी आपल्या व्याख्यानात भूगर्भातील जलसाठा त्याचप्रमाणे पाणी आडवा, पाणी जिरवा याबाबत अतिशय अभ्यासपूर्णपणे पाणी म्हणजे मानवाचे जीवन आहे आणि त्या पाण्याचा वापर आपण कसा केला पाहिजे आणि ते पाणी आपण कसे जोपासले पाहिजे आणि मिळवले पाहिजे याबाबत अनेक दाखले देऊन पाण्याचे महत्व प्रत्येकाला समजेल अशा भाषेमध्ये अनेक उदाहरणातून पटवून दिले.
याप्रसंगी राजेवाडी चे सरपंच प्रशांत शिरकांडे यांचेसह अनेकांनी आपले मनोगतातून या योजना आम्ही निश्चितपणे गाव पातळीवर रुजवल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही दिली तर चेअरमन एन. शेषागिरी राव व व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांनीही सर्व उपस्थितांना या व्याख्यानाचे दाखले देत प्रत्येकानी या व्याख्यानातील बोध घेऊन तो कृतीत आणला पाहिजे आणि ही काळाची गरज आहे असे सांगितले. यावेळी जनरल मॅनेजर सत्यनारायण रेड्डी, डीजीएम भगवान पाटील, एच आर एन एडमिन मॅनेजर सचिन खटके, केन मॅनेजर सुनील सावंत सर्व खाते प्रमुख व माळशिरस, आटपाडी, सांगोला, माण, पंढरपूर या तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते. शेवटी शेती अधिकारी दत्ता शिरसागर यांनी आभार मानले. यावेळी कार्यक्रमासाठी कटफळ येथील असंख्य शेतकरी बांधवांना स्वतःहून घेऊन येण्याची जबाबदारी कॉन्स्टेबल दत्ता खरात यांनी पार पाडली.