जे बावीसला जाणार नाहीत ते चोवीसला येणार नाहीत

जे बावीसला जाणार नाहीत ते चोवीसला येणार नाहीत
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 19/01/2024 :
श्री प्रभू रामचंद्र यांचं अयोध्येतील आगमन जसजसे जवळ येत आहे तसतसे इंडिया नावाच्या बिनबुडाच्या आघाडीच्या बुडाखालचा अंधार अधिक जास्त होत आहे कारण आजपर्यंत हिंदुस्थानी म्हणवून घेत हिंदुंची सलगपणे पन्नास साठ वर्षे इतकी गळचेपी केली की काय विचारूच नका. ह्या गांधी घराण्यातील नेत्यांनी कधीच भगव्या टोप्या डोक्यात काय तर डोक्यावर सुध्दा घातल्या नाहीत हे किती लांगूलचालन होत याचा अक्षरशः तिटकारा हिंदूना जितका तितकाच तो तीन तलाक मिळालेल्या मुस्लिम महिलांना आला. म्हणून देशातील बहुसंख्य मुस्लिम लोक सुध्दा नमो नमो चा गजर करत आहे. अहो इतकीच काय ज्यांनी बाबरी मशिदीच्या संदर्भात खटला विरोधक म्हणून लढवला त्यांनी देखील अयोध्येच निमंत्रण स्विकारल. याला म्हणतात मनाचा मोठेपणा आणि जे हिंदुंच्या द्रष्ट्या कद्रु आहेत ते म्हणतात की आम्ही बावीसला जाणार नाही. तर मग तुम्ही चोवीसला येणार कसे ! आता मतदार पैसाही घेणार नाही. कारण कधीही रातोरात चलनी नोटा बदलतील याचाही भरोसा नाही. हे महाराष्ट्रातील महाभकास आघाडीने लक्षात ठेवाव. अर्थात या सत्ता उबवून व उडवून बसलेल्या कायमच्या माजी मंत्र्यांना आता पुर्णपणे कायमची विश्रांती देण्याचा कार्यक्रम मतदारांनी हाती घेतला आहे.
हाथी मेरा साथी असं आजच्या जगात अजिबात नाही. कारण काल परवा शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तोंडी जी भाषा होती ती जितकी निरर्थक होती तितकीच ती लांच्छनास्पद होती आणि त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. कारण ते म्हणाले की अयोध्येतील मंदिरात श्री प्रभू रामचंद्र यांचीच मुर्ती असेल का मग उद्धव साहेबांनी स्वतः रामाच प्रभुत्व दाखवाव आणि आपलीच मुर्ती तिथे स्थानापन्न करावी मग त्यांच्या भेटीला साक्षात राजकारणातील महाराष्ट्रातील रावण भेटायला येतील अर्थात तो रावण कोण आहे हे सांगायची मला गरज आहे असे मला वाटत.
या सगळ्या इतिहासाची चिरफाड करताना मला मालक आणि त्यांचा हाडाचा कुरापती नोकर आठवतो कारण नोकरांने काही केल्या मालकाला खड्यात घालू नये अशी एक म्हण आहे पण जर नोकर हाच जर मालकीहक्क दाखवत असेल तर काय होईल , अर्थात मालकाकडे इतकी गडगंज संपत्ती आहे ती पुढच्या पन्नास वर्षांत मोजली तरी मोजणारे थकतील पण संपत्ती संपणार नाही तर अशा या विश्व प्रवक्ते असणाऱ्या आमदारांच्या जिवावर त्यांची राजरोसपणे ठासून राज्यसभेची खासदारकी मिळवणाऱ्या संजय राऊत यांच्या अंगी रावण संचारला असून त्यांनी चोवीसच्या मतांची बेगमी करताना बाबरी पाडली तेंव्हा मात्र श्री प्रभू रामचंद्रांच मंदिर त्याच जागेवर होत असं दैनिक सामना यात अनेकदा लिहिलं होतं पण त्यांना अचानकपणे असा साक्षात्कार झाला की बाबरीचा ढाच्या आताच्या मंदिरापाशी चार किलोमीटर दूर आहे.आहे का नाही या सारी पोपटाची कमाल आणि धमाल त्यामुळे याची पुरेपूर कल्पना असताना प्रख्यात मिश्कीलपणे टीकाटिप्पणी करणारे पु.ल. देशपांडे म्हणतात की एकदा एकाने कुत्रा , मांजर आणि पोपट पाळला होता त्यामुळे त्यांच्यात चांगलं जमतं होत पण हे खरं असलं तरी त्या मालकाला अवदसा आठवली म्हणून त्याने माकड आणलं परिणामी सगळा बटयाबोळ झाला अशी ही उर्वरित शिल्लक शिवसेनेची दुरावस्था झाली आहे.
राजाभाऊ त्रिगुणे .
पत्रकार,जेष्ठ राजकीय विश्लेषक