संपुर्ण जगामध्ये ज्ञानदान हेच सर्वश्रेष्ठ व पवित्रदान आहे-बी.टी.शिंदे.

संपुर्ण जगामध्ये ज्ञानदान हेच सर्वश्रेष्ठ व पवित्रदान आहे-बी.टी.शिंदे.
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे.
अकलूज दिनांक 03/05/2024 :
शिक्षणाशिवाय मानवाचे आयुष्य निरर्थक असते.मनापासुन शिक्षकच शिकवत असतो आणि शिक्षणही देत असतो.आयुष्यात ज्ञानदान हेच सर्वश्रेष्ठ पवित्र दान असल्याचे मत मुख्याध्यापक बी.टी.शिंदे यांनी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळ अकलुज संचलीत विझोरी येथील विजयसिंह मोहिते-पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.टी.शिंदे आपल्या ३५ वर्षे आणि आठ महिन्यांच्या ज्ञानदानाच्या पवित्र व प्रदिर्घ कार्यातुन सेवानिवृत्त झाले. त्यावेळी विद्यालय व नागरिकांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजीत केलेला होता.त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते.
१ मे महाराष्ट्र दिन, विद्यालयाचा वार्षिक निकाल आणि मुख्याध्यापक बी.टी.शिंदे यांचा सेवापुर्ती दिन अशा दुग्ध शर्करा योगामुळे वातावरण भारावुन गेले होते.
पुढे बोलताना बी.टी.शिंदे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवेच्या कालखंडातील आनेक कटु-गोड आठवणी सांगितल्या. स.म. शंकरराव मोहिते पाटील यांनी शिक्षणाचे विणलेले जाळे ग्रामीण भागातील मुलांसाठी अमृता समान आहे.जयसिंह मोहिते- पाटील,संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील, स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांच्या पाठबळामुळे आपण कडक शिस्तीतुन मुलांना शिक्षण देण्यास यशस्वी ठरल्याचे सांगितले.
आपल्या या यशस्वी वाटचालीत त्यांनी आपली अर्धांगीनी आणि दोन मुलींनाही मौलीक स्थान देत कुटुंबियांच्या सहकार्यामुळेच आपण आपले सर्व दुःख उंब-याचा आत ठेवुन काम करु शकलो.त्यामुळे आपण जगातील सर्वात भाग्यवान असल्याचे सांगितले.
प्रशालेतील विद्यार्थीनी कु.वैष्णवी नामदास,कविता कोकरे,सहशिक्षिका कु.जाधव, सौ.चव्हाण,ऊज्वला देवकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागल्याने त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.तसेच सर्व सहकारी शिक्षक,शिक्षिकांना धन्यवाद दिले.या सत्कार समारंभ प्रसंगी विद्यालायात ९२.१६ गुण मिळवुन इ.९ वीमध्ये प्रथम आलेल्या कु.आंबिका चौगुले या विद्यार्थीनीचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर नानासाहेब काळे,सुरज ताम्हाणे, सोलापुर जिल्हा मध्य.बँकेचे व्यवस्थापक अप्पासाहेब गायकवाड,हणुमंत पवार,दोशी कुटुंबीय,दिपकराव गायकवाड यांचेसह परीसरातील नागरीक उपस्थित होते.